ठाणे - दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, याचा प्रत्यय ठाणे पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत ठाणेकरांना आला आहे. फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून चौघांनी उल्हासनगर येथील रहिवासी व सुशिक्षित बेरोजगार असलेल्या निनाद तेलगोटे यांना ‘खेकड्याचे निळे रक्त’ यूकेमधील केंट फार्मास्युटिकल लिमिटेड कंपनीस पाठवण्याचे आमिष दाखवून सुमारे पावणेचार लाखांची फसवणूक केली आहे. याप्रक रणी ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ ने नवी मुंबईतील अब्दुल कादीर इब्राहिम कच्छी (४०) याला शनिवारी पहाटे अटक केली. तर, यामध्ये पाहिजे असलेल्या तिघांचा शोध सुरू असून त्यामध्ये एका महिलेसह एका नायजेरियन तरुणाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितलेअटक केलेल्या कच्छी याच्या तपासात अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची आंतरराष्टÑीय टोळी आहे. सध्या ती भारतातील विविध राज्यांत सक्रिय आहे. तसेच कच्छी याला कासारवडवली पोलीस ठाण्यात जानेवारी २०१८ मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यात अटक केली होती. तसेच अशा प्रकारे तो ३० लाखांचा गुन्हा उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी सांगितले. ही मंडळी दुर्मीळ वस्तू खरेदीची किंमत कमी असल्याचे सांगून त्या वस्तूंची विक्री केल्यास त्याची जास्त कि ंमत मिळते, असे भासवून विश्वास संपादन करतात. जे कधी कोणी ऐकलेले नसते, असे सांगितल्यावर लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. नागरिकांनी भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
तरुणाला पावणे चार लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 5:38 AM