शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

ठाणे : लसीकरण केंद्रावर गर्दीच गर्दी; शिवाई नगर केंद्रावर शिवसेनेचे दोन पदाधिकारी आपसात भिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 3:42 PM

Coronavirus Vaccine : लसी उपलब्ध नसल्यानं अनेक दिवसांपासून लसीकरण केंद्रं होती बंद. शनिवारी अनेक केंद्रांवर झाली होती गर्दी.

ठळक मुद्देलसी उपलब्ध नसल्यानं अनेक दिवसांपासून लसीकरण केंद्रं होती बंद. शनिवारी अनेक केंद्रांवर झाली होती गर्दी.

ठाणे  : मागील काही दिवस लसीकरण उपलब्ध न झाल्याने शहरातील लसीकरण केंद्र बंद होती. परंतु शनिवारी पुन्हा लसीकरण सुरु झाल्याने पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी शहरातील सर्वच लसीकरण केंद्रावर झुंबड उडाल्याचे चित्र दिसून आले. तर शिवाई नगर भागात लसीकरणाच्या मुद्यावरुन शिवसेनेच्या दोन पदाधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते आपसात भिडल्याचे दिसून आले. अखेर येथे पोलिसांना पाचारण करण्यात आल्यानंतर वातावरण शांत झाले. परंतु या काळात लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले होते. दुसरीकडे खासदार राजन विचारे यांनी आयोजित केलेल्या लसीकरण केंद्रावरही गर्दी होऊन तेथेही पोलिसांना पाचारण करण्याची वेळ आली होती.

मागील दोन ते तीन दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यातच लसीकरण बंद होते. शुक्रवारी सांयकाळी लस प्राप्त झाल्यानंतर ठाण्याच्या विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. त्यामुळे सर्वच लसीकरण केंद्रावर पहाटेपासूनच नागरीकांनी केंद्रावर बाहेर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. काही ठिकाणी ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोनही पद्धतीने लसीकरण सुरु होते. त्यातही काही केंद्रावर लसी कमी आल्याने यात आणखी गोंधळ वाढल्याचे चित्र बहुतेक सर्वच केंद्रावर दिसत होते. त्यातही मागील काही दिवसापासून पालिकेच्या लसी घेऊन राजकीय मंडळींकडून त्या वाटप केल्या जात आहेत. मोफत मिळणाऱ्या लसींवरदेखील राजकीय मंडळींचे मार्केटींग सुरु असल्याचे चित्र शहरभर दिसत होते. त्यामुळेच अधिकचा गोंधळ होऊन काही ठिकाणी राजकीय मंडळींना नागरीकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळही आल्याचे पहावयास मिळाले.

दरम्यान दुसरीकडे शिवाई नगर केंद्रावर देखील ऑफलाईन पद्धतीने लसीकरण सुरु होते. परंतु शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने आदल्या दिवशीच आपल्या संस्थेचे टोकन देऊन ऑफलाईनचे सर्वच बुकींग हाकेले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी रांगेत उभ्या असलेल्यांना लस मिळत नव्हती. त्यामुळे याच मुद्यावर शिवसेनेच्या दुसऱ्या पदाधिकाऱ्याने आक्षेप घेतला. त्यावरुन या ठिकाणी बराच वेळ गोंधळ उडाला होता. अखेर हा गोंधळ शांत होत नसल्याने पोलिसांनी पाचारण करावे लागले. त्यानंतर काही काळ हे लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले. 

पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु झाले. तर खासदार राजन विचारे यांनीदेखील शनिवारी मोफत लसीकरण ठेवले होते. त्याठिकाणी देखील थेट दोन किमी पर्यंत नागरिकांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. याठिकाणीदेखील मर्जीतील नागरिकांना आधी सोडले जात असल्याच्या मुद्यावरुन इतर नागरीकांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे त्याठिकाणीदेखील पोलिसांनी पाचारण करावे लागले. 

मोफतच्या लसीवर नगरसेवकांचे मार्केटिंग  ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या राजकीय मंडळींना लस दिल्या जात आहेत. शासनाकडून मोफत लस उपलब्ध होत आहेत. त्याच लस या मंडळींना दिल्या जात आहेत. त्यामुळे साहजिकच नागरीकांना त्या मोफतच मिळणार आहेत. परंतु असे असेल तरी या नगरसेवकाच्या माध्यमातून त्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून मोफत लसीकरणाचे फलक मात्र शहराच्या विविध भागात लागल्याचे दिसून येत असून नगरसेवक तर या माध्यमातून स्वत:चे ब्रॅन्डींग करतांना दिसत आहेत.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस