ठाणे : ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून ही ठाण्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे. परंतु दुसरीकडे आता लक्षणे नसलेले रुग्ण आता सात दिवसात बरे होऊन घरी जात आहेत. त्यानुसार शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता २० टक्यांवरुन ४२ टक्यांवर आले आहे. सोमवार पर्यंत ८३८ रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. तर याच कालावधीत २ हजाराहून अधिक रुग्ण उपचार घेत असले तरी प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही १२०० आसपास आहे. ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कधी १०० ते कधी १५० रुग्ण शहरात आढळत आहेत. त्यामुळे ठाणेकरांच्या चिंतेत वाढ होत आहे. परंतु आता क्वॉरन्टाइन केलेल्या रुग्णांची संख्यमुळेच कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही वाढतांना दिसत आहे. त्यामुळे ही देखील काहीशी शहरासाठी समाधानकारक बाब म्हणावी लागणार आहे. शहरात आजच्या घडीला २ हजाराहून अधिक रुग्ण हे कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यातील ८३८ हून अधिक रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. मागील काही दिवसात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे मागील काही दिवसांपूर्वी २० टक्यांच्या आसपास होते, तेच आज प्रमाण हे ४२ टक्यांपर्यंत आले आहे. ही ठाणेकरांसाठी आनंदाची किंबहुना समाधानाची बाब म्हणावी लागणार आहे. तर मृतांचा आकडा हा आजच्या घडीला ६७ वर गेला आहे. परंतु मृतांमध्येही ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. ज्यांचे वय ६० हून अधिक आहे, ज्यांना इतर आजारांच्या व्याधी आहेत, अशा रुग्णांचे प्रमाण मृतांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे ही देखील समाधानाची बाब म्हणावी लागणार आहे.दुसरीकडे कोरोनावर मात करण्यासाठी महापालिका स्तरावर प्रयत्न सुरु असून नागरीकांनी घरा बाहेर पडू नये असे आवाहन पालिकेकडून केले जात आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी ठाणेकरांनी घाबरुन जाण्याचे कारण नसले तरी काळजी मात्र घेणे गरजेचे असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यातही आता ज्यांनी सौम्य लक्षणे दिसत असतील अशांतर आता घरीच उपचार घेण्याचा सल्ला पालिकेने दिला आहे. परंतु झोपडपटटी भागात राहणाºया नागरीकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आले ४२ टक्यांवर, आजच्या घडीला ८३८ जणांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 4:05 PM