शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

ठाणे जि. प.च्या ३६३ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी; १० जणांची पदोन्नती तर ४४ जणांचे पुनर्विलोकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 7:11 PM

प्रत्येक कर्मचाऱ्यांला त्याच्या सेवेनुसार शासनाचे असणारे लाभ मिळणे गरजेचे असतात. मग ती वेतनश्रेणी वाढ असेल, पदोन्नती किंवा इतर लाभ असले तरी त्याचा कर्मचाऱ्यांला हे लाभ विहीत वेळेत मिळणे देखिल महत्वाचे असतात. त्यामुळे शासनाच्या निर्णयाची,धोरणाची अंमलबावणी करून हे लाभ दिले आहेत. - - हिरालाल सोनवणे सीईओ- जिल्हा परिषद ठाणे

ठळक मुद्देवरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ३६३ कर्मचाऱ्यांनापदोन्नती दहा जणांची४४ कर्मचाऱ्यांचे पुनर्विलोकन करण्याचे आदेश

ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या (जि.प.) प्रशासन आणि वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजनेच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ३६३ कर्मचाऱ्यांना करून देण्यात आला. तर पदोन्नती दहा जणांची करण्यात आली. याशिवाय ३० वर्षे सेवा झालेल्या ४४ कर्मचाऱ्यांचे वैयक्तीक माहितीचा लेखाजोखा तपासण्यासाठी त्याचे पुनर्विलोकन करण्याचे आदेश जि.प.ने जारी केले आहे.        जि.प.ला सातवा वेतन आयोग लागू झाल्यामुळे या कर्मचाऱ्यांना पदोन्नती, सेवा पुनिर्वलोकन आणि वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ दिला जात आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचा लाभ वेळीच प्राप्त करून देण्यासाठी जि.प.चे अध्यक्षा दीपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार विशेष लक्ष देऊन त्यांना त्याच्या सेवेस अनुसरून लाभ देण्याचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी डी. वाय. जाधव यांनी दिली. शासनाच्या २ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयाची अमलबजावणी करीत कर्मचाऱ्यांना त्यांचा लाभ करून देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.     लाभ मिळालेल्यांमध्ये सामान्य प्रशासन विभागातील वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांची सेवा दहा वर्षे, २० आणि ३० वर्षे सेवा पूर्ण झालेल्या ३६३ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यात आला आहे. आश्वासित प्रगती योजनेव्दारे या वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्यात आला आहे. तर वित्त विभागातील ४० कर्मचाऱ्यांना ही वेतनश्रेणी लाभ देण्यात आला आहे. या लाभामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत वाढ होणार आहे. तर प्रशासन विभागातील सहा कर्मचाऱ्यांना प्रत्येक्ष पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. वित्त विभागातील चार कर्मचाऱ्यांना या प्रत्येक्ष पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. या व्यतिरिक्त सेवानिवृत्त झालेल्या सहा कर्मचाऱ्यांना १२ आणि २४ वर्षे सेवेचा लाभ देखिल देण्यात आला आहे. या शिवाय ज्या कर्मचाऱ्यांचे वय ५४ वर्षे किंवा ज्यांची सेवा ३० वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवा पुनर्विलोकन शासनाच्या धोरणास अनुसरून केले जात आहे. यात प्रशासनातील २७ आणि वित्त विभागातील १७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे................कोट -

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद