शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

CoronaVirus अबब! ठाणे जिल्हा १० हजार पार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 5:32 AM

एका दिवसात आढळले कोरोनाचे ४४५ रुग्ण : १८ जणांचा मृत्यू, एकूण मृत्यूसंख्या ३४२

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ४४५ बाधित रुग्णांच्या नोंदीसह १८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा १० हजार ४१९ झाला असून मृतांची संख्या ३४२ इतकी झाली आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

शुक्रवारी ठाणे महापालिका क्षेत्रात १५२ कोरोना बाधीतांच्या नोंदीसह पाच जणांच्या मृत्यू झाल्याने बाधितांचा आकडा तीन हजार ७९५ तर मृतांचा आकडा ११३ वर पोहोचला. नवी मुंबई महापालिकेत ८६ नव्या रुग्णासह ४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधीतांचा आकडा २ हजार ६४३ तर मृतांचा ८ वर पोहोचला आहे.

कल्याण डोंबिवलीत ५ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीतांचा आकडा एक हजार ३२७ इतका झाला. मीरा-भार्इंदरमध्ये ४६ रुग्णांच्या नोंदीसह ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा ९०३ तर मृतांचा ४८ वर गेला आहे. भिवंडीमध्ये २० रुग्णांची नोंद करण्यात आल्यामुळे बाधितांचा आकडा २३५ झाला आहे. येथे दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांची संख्या १३ वर गेली आहे.बदलापूरमध्ये सात; तर अंबरनाथमध्ये १७ रुग्णच्उल्हानगरमध्ये ४० रुग्णांसह एका मृत्यूची नोंद झाली असून बाधीतांचा आकडा ४८१ तर मृतांचा २० झाला. बदलापूरमध्ये सात रुग्णांची नोंद झाली आहे. येथे बाधितांचा आकडा २७३ तर मृतांचा आठ झाला आहे. तर, अंबरनाथमध्ये १७ रुग्णांची नोंद झाली असून बाधितांचा आकडा ३०४ वर गेला.च्ठाणे ग्रामीण भागात २५ रुग्णांसह दोन मृत्यूची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा ४५८ तर मृतांचा आकडा १२ झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस