ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ चा निकाल गुरूवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यात ठाणे जिल्ह्याचा निकाल ८८.९० टक्के लागला आहे. यावर्षी देखील मुलींनी बाजी मारली असून या परिक्षेत मुलींचा निकाल ९१.३६ टक्के लागला आहे. ठाणे जिल्ह्यात मुरबाड भागाचा निकाल सर्वाधीक लागला आहे. ९६.८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून बारावी परिक्षेच्या निकालाची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये हती अखेर आज तो निकाल लागला. सकाळी ११ वा. ऑनलाईन पद्धतीने हा निकाल लागला. काही वेळातच मुलांनी हा निकाल पाहताच त्यांनी एकच जल्लोष केला. ठाणे जिल्ह्यात ११ तालुके असून या तालुक्याचा एकूण निकाल ८८.९० टक्के लागला आहे. यात मुरबाड तालुकयाचा सर्वाधीक निकाल लागला आहे तर यंदा या निकालात उल्हासनगर महापालिकेचा लागला आहे.जिल्ह्यात ८७७४९ विद्यार्थी उत्तीर्ण
यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी ९९१७० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते यात ५२०५२ मुले तर ४७११८ मुलींचा समावेश होता. ९८६९६ विद्यार्थी परिक्षेला बसले होते पैकी ८७७४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परिक्षेला बसलेले ५१७९१ मुले तर ४६९०५ मुली असून यापैकी ४४८९६ मुले तर ४२८५३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. अशा प्रकारे मुलांचा निकाल ८६.६८ चक्के तर मुलींचा निकाल ९१.३६ टक्के लागला आहे.ठाणे जिल्ह्यात मुरबाड क्षेत्र अव्वल
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, अंबरनाथ-बदलापूर, भिवंडी, मुरबाड, शहापूर, ठाणे मनपा, नवी मुंबई मनपा, मीरा भाईंदर मनपा, कल्याण डोंबिवली मनपा , उल्हासनगर मनपा, भिवंडी मनपा आदी क्षेत्रातील विद्यार्थी प्रविष्ट होते. यामध्ये मुरबाड क्षेत्राचा निकाल सर्वाधीक लागला. यात ९६.८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.तालुकानिहाय बारावी परिक्षेचा निकालतालुका टक्केकल्याण ग्रामीण ९१.४४अंबरनाथ ८६.२६भिवंडी ८६.९९मुरबाड ९६.८९शहापूर ८९.९१ठाणे मनपा ९०.१८नवी मुंबई मनपा ८९.५७भाईंदर मनपा ९१.४६कल्याण डोंबिवली मनपा ८७.०८उल्हासनगर मनपा ८६.१२एकूण ८८.९०