ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव परत वाढत आहे. मधल्या काळात कमी होत जाणारी रुग्णासंख्या आता पुन्हा वाढू लागली असल्याचे रोजच्या आकडेवारी वरून दिसत आहे. शुक्रवारी शुक्रवारी ठाणे जिल्ह्यात ६२४ रुग्णांची तर १६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या २ लाख ३१ हजार ७९० तर, मृतांची संख्या आता ५ हजार ७२६ झाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगर पालिका हद्दीत १६८ बाधितांची तर, ३ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे बाधितांची संख्या ५२ हजार ३०६ तर, १२४६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १६२ रुग्णांची तर, २ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आहे. कल्याण डोंबिवलीत १२४ रुग्णांसह दोघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये ५५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात १० रूग्णांची नोंद झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच उल्हासनगरमध्ये ४२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. अंबरनाथमध्येही १६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये ३५ रुग्णांची नोंद करण्यात आली. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, ठाणे ग्रामीण भागात १२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या १८ हजार २७० झाली आहे. तर मृतांचा आकडा ५६५ झाला आहे.