ठाणे : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. शनिवारी दिवसभरात ७४६ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आता २ लाख ६९ हजार ६५ रुग्णांची नोंद झाली. तर जिल्ह्यातील मृतांची संख्या ६ हजार २९९ वर गेली आहे.
ठाणे शहरात २२० रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या आता ६३ हजार ४९६ झाली आहे. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूंची संख्या १ हजार ४०० झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत २१० रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता ६४ हजार ३८६ रुग्ण बाधित असून १ हजार २०७ मृत्यूंची नोंंद झाली आहे.
उल्हासनगरमध्ये ९ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ९५७ झाली. तर, ३७२ मृतांची नोंद कायम आहे. भिवंडीला सात बाधितांसह एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ८३१ असून मृतांची संख्या ३५५ कायम आहे. मीरा-भाईंदरमध्ये ६४ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या २७ हजार ४३५ असून मृतांची संख्या ८०४ आहे.
अंबरनाथमध्ये १३ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधित आठ हजार असून मृत्यू ३१५ आहेत. बदलापूरमध्ये ४० रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित १० हजार १२५ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू नसल्यामुळे मृत्यूंची संख्या १२७ कायम आहे. ग्रामीणमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही.आता बाधित १९ हजार ६७३ आणि आतापर्यंत ५९७ मृत्यू झाले आहेत.