शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

कोरोनात आईवडील दगावलेल्या बालकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 7:59 PM

कोरोनामुळे आई-वडील दोन्ही पालकांचा किंवा एका पालकाचा मृत्यू झालेल्या ठाणे जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या सध्या घ्या सर्वेक्षणानुसार एकूण सात हजार 445 मयत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनामुळे आई-वडील दोन्ही पालकांचा किंवा एका पालकाचा मृत्यू झालेल्या ठाणे जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या सध्या घ्या सर्वेक्षणानुसार एकूण सात हजार 445 मयत आहेत. या कुटुंबाचे सर्वेक्षण करणे व या बालकांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सुविधांसह या मुलांना कायदेशीर सेवा पुरवणे, त्यांना मदत करणे, त्यांचे समुपदेशन व पुनर्वसन करणे आदी विषयांवर आज ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन समाधानकारक सकारात्मक चर्चा सोमवारी पार पडली.

         येथील समिती सभागहात जिल्हाधिकारी तथा या ठाणे जिल्हा कृतीदलाचे अध्यक्ष, यांच्या अध्यक्षतेखाली बालकांची काळजी आणि संरक्षण अंतर्गत कोवीडमुळे आई-वडील हे दोन्ही किंवा एका पालकांचा मृत्यु झाला असल्यास त्यांच्या मुलांकरिता  शासन निर्णयानुसार व मार्गदर्शन सुचनेनुसार आज टास्क फोर्सच्या सदस्यांनी जिल्ह्यात बालकांच्या संबधित विविध योजना तसेच करावयाची कार्यवाही तसेच कृती दलातील सदस्यांच्या जबाबदाऱ्या आदीं विषयांवर या बैठकीत सखोल चर्चा झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती मदत करण्याच्या विषयींवर चर्चा झाली आहे. 

      यावेळी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे आई-वडील दोन्ही पालकांचा किंवा एका पालकाचा मृत्यू झालेल्यांमध्ये जिल्ह्यात सात हजार 445 मयत अढळून आले आहेत. या कुटुंबाचे सर्वेक्षण करणे व या बालकांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सुविधांसह या मुलांना कायदेशीर सेवा पुरवणे, त्यांना मदत करणे, त्यांचे समुपदेशन व पुनर्वसन करणे आदी विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या या बैठकीत आज समाधानकारक  शिक्कामोर्तब झाले, असे ठाणे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी तथा जिल्हा कृती दल समन्वयक रामकृष्ण रेड्डी यांनी लोकमतला सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या