शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

ठाणे जिल्ह्यामध्ये झाला स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 5:09 AM

भिवंडीत नगरसेवकांची पाठ : महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, शहरात जनजागृती रॅली

भिवंडी : प्रभूआळी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला. मात्र या मोहिमेकडे बहुतांश नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने शहरात स्वच्छता मोहिमेचा फज्जा उडाला. हा कार्यक्रम सर्व नगरसेवकांना कळविला होता. परंतु अनेक काँग्रेस नगरसेवकांसह इतर पक्षाच्या नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. महापौर जावेद दळवी, आयुक्त मनोहर हिरे आदी उपस्थित होते. शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहीम राबवली.स्वच्छता संवाद पदयात्रा सुरूमहात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्ताने स्वच्छता संवाद पदयात्रेला प्रारंभ झाला. त्याआधी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेला सुरूवात करण्यात आली. पाटील यांच्या हस्ते पदयात्रेचे उद्घाटन झाले. पदयात्रा ३० जानेवारीपर्यंत ग्रामीण भागात जाऊन स्वच्छतेचा संदेश देणार आहे. पाटील यांच्यासह स्वच्छता मोहिमेत आमदार महेश चौघुले, शहराध्यक्ष संतोष शेट्टी, श्याम अग्रवाल आदी सहभागी झाले होते.शहर स्वच्छतेची हाकउल्हासनगर : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांनी स्वच्छ व सुंदर शहराची हाक देत नेताजी चौक ते पालिका दरम्यान रॅली काढण्यात आली. तसेच शहर काँग्रेसच्यावतीने शास्त्री चौक ते पालिका दरम्यान पदयात्रा काढण्यात आली. पालिका कर्मचाºयांनीही जनजागृती फेरी काढली. प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोलचा वापर करू नका असा संदेश यावेळी देण्यात आला. नागसेन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून स्वच्छतेची हाक दिली. महापौर पंचम कलानी,आयुक्त गणेश पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.गोंधळींनी दिला संदेशअंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्यावतीने शहर स्वच्छतेसाठी कार्य करणाºयांचा आणि या मोहिमेत सहकार्य करणाºयांचा जाहीर सत्कार करण्यात आला. संस्था आणि संघटनेच्या माध्यमातून शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात गोंधळींनी स्वच्छतेचा संदेश दिला. अंबरनाथ नगरपालिकेतर्फे सूर्याेदय सभागृहात कार्यक्रम झाला. स्वच्छ प्रभाग स्पर्धेतील विजेत्या प्रभागातील नगरसेवकांचा आणि त्या प्रभागातील स्वच्छतादूतांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छ प्रभागात नगरसेवक सुभाष साळुंखे यांचा प्रथम तर अपर्णा भोईर आणि वीणा उगले यांच्या प्रभागाला अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात आला. पथनाट्यांतून जनजागृती करण्यात आली. नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, मुख्याधिकारी देविदास पवार आदी उपस्थित होते.सामाजिक संस्था,शाळा, विद्यार्थ्यांचा सहभागराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पालिकांबरोबरच सामाजिक संस्था, शाळा, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. शहर स्वच्छतेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असा निर्धार व्यक्त करण्यात आला.१३३ शाळा, महाविद्यालयांचा सहभागमीरा रोड : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मीरा-भार्इंदरमध्ये महापालिकेसह विविध शाळा, संस्था यांच्यातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहरात प्रभातफेरी काढण्यात आली. १३३ शाळा व महाविद्यालयांचे सुमारे २६ हजार विद्यार्थी अभियानात सहभागी झाले होते. पालिकेने प्लॅस्टिक पिशव्या वापरणाºयांकडून ४२ हजारांचा दंड वसूल करत ३०० किलो प्लॅस्टिक जप्त केले. महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, आयुक्त बालाजी खतगावकर, सभागृह नेते रोहिदास पाटील आदींनी स्वच्छतेची शपथ घेतली. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता आठवड्यातून दोन तास व वर्षात १०० तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचा सर्वांनी निश्चय केला. भार्इंदरच्या नेहरूनगर झोपडपट्टीत विद्यार्थ्यांनी श्रमदान केले अशी माहिती उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली. माजी महापौर गीता जैन यांच्या अस्त्र फाउंडेशनच्यावतीने उत्तन समुद्र किनारा व न्यू म्हाडा वसाहत येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान