ठाणे : शेतक-यांच्या कर्जमाफीचे अर्ज सरकारच्या पोर्टलवरील ई-महासेवा केंद्राद्वारेच भरले जात आहे. परंतु, मुदत लक्षात घेता सामाजिक बांधीलकी जपून ठाणे जिल्हा मध्यवर्ती (टीडीसीसी) बँकेने त्यांच्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील २२ शाखांमधून कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यास प्रारंभ केला आहे. राज्यात प्रथमच या जिल्हा मध्यवर्ती बँकेने अर्ज भरण्याची जबाबदारी स्वीकारल्याचे सहकार विभागाच्या कोकण विभागीय सहसंचालक ज्योत्स्ना लाटकर यांनी सांगितले.येथील टीडीसीसी बँकेच्या मुख्य कार्यालयातील बोर्ड सभागृहात कर्जदार शेतकºयांचे कर्जमाफीचे आॅनलाइन अर्ज भरून लाटकर यांनी या उपक्रमाचे उद्घाटन केले. त्या वेळी त्या बोलत होत्या. आतापर्यंत केवळ ५०० शेतकºयांचे आॅनलाइन अर्ज भरण्यात आल्याची खंत लाटकर यांनी व्यक्त केली. मात्र, सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी बँक सहकार्य करत आहे. राज्यातील अन्य जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये प्रथमच टीडीसीसीने ही जबाबदारी घेतली आहे, त्याप्रमाणे अन्य बँकांनीही पुढे येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या उद्घाटन सोहळ्यास टीडीसीसीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष भाऊ कुºहाडे, डीडीआर एस.एम. पाटील आणि बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते.या वेळी ठाणे जिल्ह्यातील पाच व पालघरमधील पाच शेतकºयांचे अर्ज आॅनलाइन भरून उपक्रमास प्रारंभ केला. या दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे १८ हजार शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. त्यांचे अर्ज शासनपातळीवर भरले जात आहे. ठाणे, पालघरमध्ये सुमारे ३६ हजार १३८ सभासद थकबाकीदार आहेत. त्यातील १८ हजार शेतकरी कर्जमाफीला पात्र ठरले आहेत.
कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्याचा मान ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 2:07 AM