ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष - उपाध्यक्ष पदांसह जिल्ह्यातील पाच पंचायत समित्यांच्या सभापती - उपसभापती निवडीचा मुहूर्त जिल्हा प्रशासनाने निश्चित केला आहे. यामध्ये जि.प.चे अध्यक्षांची १५ ला तर ८ जानेवारीला म्हणजे एक आठवडा आधी सभापतींची निवड निश्चित करण्यात आली आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी यांची तर कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी पंचायत समित्यांच्या सभापती - उपसभापतींच्या निवडीसाठी संबंधीत तहसिलदार यांच्यावर पिठासन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जबाबदारी टाकली आहे. लोकमतने ‘यंदा जिल्हा परिषद सदस्यांच्या पळवापळवीची नेत्याना भीती’ या मथळ्याखाली २९ डिसेंबर रोजी वृत्तप्रसिद्ध करून जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्षांच्या निवडीचा मुहूर्त निश्चित केला असता तो तंतोतंत खरा ठरला आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम खरे म्हणजे येथील वर्तक सभागृहात होणे अपेक्षित आहे. पण हा सभागृह नादुरूस्त असल्यामुळे जिल्हा नियोजन भवनात हा कार्यक्रम पार पडणार आहे. पसंतीच्या उमेदवारास हातवर करून पाठिंबा द्यावा लागणार आहे. यासाठी व्हिडीओ चित्रीकरण देखील केले जाणार आहे. यासाठीचा उमेदवारी अर्जही त्यास दिवशी सभागृहात भरावा लागणार आहे. त्यानंतर छाननी, उमेदवारी मागे घेणे आणि त्यानंतर आवश्यकता असल्यास हातवर करून मतदान प्रक्रिया देखील एकाच दिवशी सभागृहात पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या या पहिल्या सभेचे पीठासन अधिकारी म्हणून ठाणे येथील उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी जबाबदारी पार पाडणार आहेत.जिल्ह्यातील पाच पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य आहेत. यासाठी पहिल्या सभेस त्यांची उपस्थिती आवश्यक असल्यामुळे त्यांची निवड एक आठवडा आधीच केली जाणार आहे. प्रत्येक पंचायत समिती सभागृहात पार पडणाऱ्यां या निवड प्रक्रियेसाठी संबंधीत म्हणजेच शहापूर, कल्याण, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ तहसीलदार पीठासन अधिकारी म्हणून काम पहाणार आहेत. यासाठी संबंधीत जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांना निवड प्रक्रियेच्या पूर्व नियोजनाचे जिल्हा प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे.
ठाणे जि.प. च्या अध्यक्ष - उपाध्यक्षांसह पाच पंचायत समित्यांच्या सभापतींचा मुहूर्त निश्चित
By सुरेश लोखंडे | Published: December 29, 2017 7:48 PM
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी यांची तर कल्याण, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर आणि भिवंडी पंचायत समित्यांच्या सभापती - उपसभापतींच्या निवडीसाठी संबंधीत तहसिलदार यांच्यावर पिठासन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जबाबदारी टाकली आहे.
ठळक मुद्देउमेदवारी अर्जही त्यास दिवशी सभागृहात भरावा लागणारजिल्हा नियोजन भवनात हा कार्यक्रम पार पडणार२९ डिसेंबर रोजी वृत्तप्रसिद्ध करून जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्षांच्या निवडीचा मुहूर्त निश्चित केला असता तो तंतोतंत खरा ठरला