ठाणे: ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातूनजिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांची तंबाखू जन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या विविध आजारांची माहिती देऊन समोपदेशन केले आणि मौखिक आरोग्य तपासणी तसेच इतर आरोग्य तपासणी शिबिराचे आज यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार , उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार तसेच सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रमा अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनिष रेंघे,डॉ.अर्चना पवार, डॉ.जिनल रोकडे,डॉ.भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मौखिक तपासणी, रक्त तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, रक्तदाब तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या.तसेच डॉ.सुरेखा मनसुख यांनी तंबाखू जन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या विविध आजारांची माहिती देऊन समोपदेशन केले.