शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

ठाणे जिल्ह्यात दीड दिवसाच्या पावणेचार लाख गणरायांना भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:37 PM

दीड दिवसांसाठी विराजमान झालेल्या घरगुतीसह सार्वजनिक अशा तीन लाख ७८ हजार ७३३ गणरायांना ठाण्यासह उपनगरातील भाविकांनी निरोप दिला. यंदाही शेकडो भाविकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाला प्राधान्य दिले.

ठळक मुद्दे पर्यावरण संवर्धनास प्राधान्य ठाण्यासह कल्याण डोंबिवलीत कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन

ठाणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघोषात मोठ्या भावपूर्ण वातावरणात शुक्रवारी दीड दिवसासाठी विराजमान झालेल्या घरगुतीसह सार्वजनिक अशा तीन लाख ७८ हजार ७३३ ठाणेकरांनी निरोप दिला. यंदाही शेकडो भाविकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी थेट तलावांमध्ये विसर्जन करण्याऐवजी पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाला प्राधान्य दिले.ठाणे महानगरपालिकेने यावर्षीही इकोफ्रेण्डली गणेशोत्सव संकल्पना राबवून गणेशमूर्ती विसर्जनासाठी विशेष कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. रायलादेवी, उपवन, आंबेघोसाळे, टिकुजिनीवाडी, बाळकुम, खारेगाव आदी कृत्रिम तलावांचा यामध्ये समावेश होता. त्याचप्रमाणे तलाव परिसरात ठिकठिकाणी निर्माल्यकलशही उभारले होते. तसेच वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, विद्युतव्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणा आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विसर्जन घाट आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी सीसीटीव्हींद्वारे पोलिसांनी विशेष निगराणी ठेवली होती. प्रत्येक विसर्जन तलावांच्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीला खासगी कार्यकर्ते होते.विसर्जनावर कुठेही अनुचित प्रकार झाला नाही. सर्वत्र भक्तांनी गुलालासह पुष्पपाकळ्यांची उधळण करून आणि ढोलताशांचा गजर करत आवडत्या बाप्पाची अखेरची आरती ओवाळून विसर्जन केले.* सहा महापालिकांच्या विसर्जन घाटावर भक्तांची गर्दीदीड दिवस गणरायाची भक्तिभावाने पूजा केल्यानंतर पर्यावरणाभिमुख गणेश विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेसह आयुक्तालयातील सहाही महापालिकांनी केलेल्या विशेष विसर्जन घाटांचा गणेशभक्तांनी आवर्जून लाभ घेतला. ठाणे शहर पोलीस आयुक्यालयातील पाच परिमंडळांतर्गत तीन सार्वजनिक, तर ३८ हजार ५७७ घरगुती गणरायांना तसेच ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रातील २९ सार्वजनिक, तर १४ हजार २०० बाप्पांना निरोप दिला.परिमंडळनिहाय असे झाले विसर्जनपरिमंडळ १- ठाणे शहर -५६ हजार १९०* परिमंडळ - २ भिवंडी : ३२ हजार ६०१* परिमंडळ - ३ कल्याण : एक लाख २२ हजार ३००* परिमंडळ - ४ उल्हासनगर : ८४ हजार ७०१* परिमंडळ -५ वागळे इस्टेट : ८३ हजार ८१

टॅग्स :thaneठाणेGanesh Visarjanगणेश विसर्जन