सुरेश लोखंडे, ठाणेसर्वाधिक महापालिकांचा जिल्हा म्हणून देशात नावारूपाला आलेल्या ठाणे जिल्ह्यात दोन हजार २७ बालके कुपोषणाच्या चक्रव्यूहात अडकली आहेत. संबंधित प्रशासन यावर उपायांचा दावा करीत असले तरी तो फोल ठरला आहे. जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी ६० लाख दहा हजार असून त्यापैकी सर्वाधिक शहरी भागात वास्तव्याला आहेत. महापालिकांचे क्षेत्र चोहोबाजूने विस्तारलेले असतानाही या जिल्ह्यात अद्यापही दोन हजार पेक्षा जास्त बालके कुपोषित जीवन जगत आहे. जिल्ह्यातील ठाणे हा संपूर्ण शहरी लोकवस्तीचा तालुका असतानाही त्यात २० बालके कुपोषित आहेत. यानंतर कल्याण तालुकाही बहुतांशी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट असताना त्यामध्येही १३९ बालके कुपोषित आढळली आहेत. महापालिका क्षेत्रालगतही परिस्थिती असून नगरपालिका, नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रातही कुपोषित बालके जीव मुठीत घेऊन जगत आहेत. ही स्थिती भूषणावह नाही.विकासाच्या जोरावर नगर पंचायत म्हणून उदयाला आलेल्या शहापूर, भिवंडी व मुरबाड या दोन्ही तालुक्यात तर सर्वाधिक बालके तीव्र कुपोषीत आहेत. शहापूर तालुक्यात ३० हजार ७२० बालकांचे आरोग्य संवंर्धक पध्दतीने वजन केले असता त्यामध्ये तीव्र कमी वजनाची म्हणजे कुपोषित एक हजार ७९ बालके आढळले आहेत. वजन केलेल्यांपैकी ७ टक्के बालकेही कुपोषीत आहेत.
ठाणे जिल्ह्यात २०२७ बालके कुपोषणाच्या चक्रव्यूहात
By admin | Published: August 30, 2015 9:31 PM