भिवंडी: केंद्र आणि राज्य शासनाच्या विद्यमाने चार वर्षांपूर्वी ग्रामीण भागासाठी १०८ रूग्णवाहिका ही राष्ट्रीय रूग्णवाहिका सेवा सह आरोग्य सेवा सुरू झाली. याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो गोरगरीब व गरजूंनी या सेवेचा लाभ घेतला. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी आणि इतर गोरगरीब रु ग्णांनाही या सेवेचा लाभ मिळाल्याने त्यांच्यासाठी ही सेवा संजीवनी ठरली आहे.ठाणे जिल्हा बहुतांशी आदिवासी आणि दुर्गमबहुल जिल्हा आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामिण आरोग्य विभागामार्फत स्थापन झालेले प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ग्रामिण गाव व पाडे खूप लांबवर असल्याने त्यांना वेळेवर साधन नसल्याने रूग्णांना खाटेवर टाकून त्यांना चालत प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जावे लागत असे. तर काही वेळा आरोग्य केंद्रांमधील रु ग्णवाहिका नादुरु स्त असल्याने किंवा वेळेवर चालक उपलब्ध नसल्याने रूग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचता येत नव्हते.त्यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांना उपचारा अभावी जीव गमवावा लागल्याच्या घटना या पुर्वी घडल्या आहेत. परंतु १०८ रूग्णवाहिका सेवा सुरू झाल्यानंतर १०८ या नंबरवर कॉल केल्यानंतर अल्पवेळेतच रु ग्णवाहिका विनामूल्य डॉक्टर समवेत उपलब्ध होत असल्याने आतापर्यंत ग्रामिण भागातील हजारो जणांचा जीव वाचला आहे. ठाणे जिल्हा हा मुंबईलगत असल्याने या जिल्ह्यातून मोठ-मोठे राज्य महामार्ग जात आहे. यामार्गावर नेहमी लहान-मोठे अपघात घडत असतात. अशा वेळी ही रूग्णावाहिका सेवा खूप फायदेशीर ठरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.ठाणे जिल्ह्यातील ग्रामिण भागासाठी एकूण ४०अत्याधुनिक रूग्णवाहिका धावत आहेत. त्यासाठी १२० डॉक्टरांची नियुक्ती असुन ९४ चालकांद्वारे ही मोफत सुविधा संपुर्ण जिल्ह्यात दिली जात आहे. सुपरवायझर मिलींद कांबळे,व्यवस्थापक रवींद्र माने,उपव्यवस्थापक जितेंद्र मोरे यांच्या नियंत्रणाव्दारे ही सेवा सुरू आहे. १०८ नंबरवर कॉल केल्यावर रु ग्णवाहिका डॉक्टरसमवेत उपलब्ध होते.त्यामुळे घटनास्थळी रूग्णावाहिका पोहचून रु ग्णवाहिकेमध्ये डॉक्टारांमार्फत रूग्णांवर उपचार केले जातात. तसेच गरज पडल्यास पुढील उपचारासाठी रूग्णास जवळील रु ग्णालयात अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले जाते.गेल्या चार वर्षात ठाणे जिल्हातील ग्रामिण भागातील सुमारे १ लाख १५ हजार गरजूंनी व रूग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून हजारो रूग्णांचे प्राण वाचविण्यात १०८ रूग्णावहिकेच्या टीमला यश आले आहे.मागील चार वर्षात १०८ रूग्णावाहिकेव्दारा विविध प्रकारच्या रु ग्णांना सेवा दिली. त्यानुसार अपघात ६८१३,प्रसुती २३,७८९, ह्रदयविकार ४५६, आगीत जळालेले ६५४,विषबाधा ३७१४,विद्युतप्रवाह १०१, पडून जखमी झालेले ४७५५, मोठे अपघात ४१८, जखमी २४७, आत्महत्या प्रयत्न १५४,हल्ले व दंगे १२१७,इतर अपत्कालीन ७२,५१९ या रूग्णांना सेवा पुरविल्या आहेत.मागच्या वर्षी वज्रेश्वरी येथे एका खाजगी बसला अपघात झाला होता त्यावेळी आम्हीच घटनास्थळी १० रु ग्णवाहिका त्वरीत उपलब्ध करून देत ३२ जखमींवर वेळीच उपचार केले होते. ही घटना आम्हाला खूप समाधान करून देत आहे.-मिलींद कांबळे, जिल्हा सुपरवायझरया रूग्णवाहिका सेवेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ मिळविण्यासाठी १०८ क्रमांकवर कॉल करून सुविधा घेतली पाहिजे- रवींद्र माने, जिल्हा व्यवस्थापक
ठाणे जिल्हयातील ग्रामिण रूग्णांसाठी १०८ रूग्णवाहिका सेवा ठरली जीवनदायिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:22 AM
भिवंडी : केंद्र आणि राज्य शासनाच्या विद्यमाने चार वर्षांपूर्वी ग्रामीण भागासाठी १०८ रूग्णवाहिका ही राष्ट्रीय रूग्णवाहिका सेवा सह आरोग्य ...
ठळक मुद्दे१०८ रु ग्णवाहिका सेवा ठरली जीवनदायीचार वर्षात ४० रु ग्णवाहिका आणि १२० डॉक्टरद्वारे सेवा पुरविलीग्रामिण व दुर्गम भागातील रूग्णांना मिळाला लाभ