सुरेश लोखंडेठाणे : कोरोना पाठोपाठ आता स्वाईन फ्ल्यूचे रु ग्ण जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्ययात गटारीनंतर आता रक्षाबंधन आणि दहीहंडी या गर्दीच्या सणांदरम्यान भेटीगाठीसाठी एकत्र येण्याचे प्रमाण वाढल्यामुळे स्वाइन फ्ल्यूची रु ग्ण संख्या सध्या ५२ वर गेली आहे. या वाढत्या रुग्णांसह राज्यभरात शुक्रवारपर्यंत सर्वाधिक १२ मृत्यू झालेल्या ठाणे जिल्ह्यात पुन्हा दोन मृतांची वाढ होऊन एकूण १४ मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.
राज्यात स्वाईन फ्ल्यूचे सुमारे ५१ मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात ठाणे जिल्ह्यातील १४ मृत्यूचा समावेश आहे. स्वाईन फ्यूच्याा या मृतांच्या संख्येत सर्वाधिक ठाणे जिल्ह्यातील मृतांमुळे चिंतेत भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४०२ स्वाइन फ्लूच्या एकूण रु ग्ण संख्येची नोंद झाली आहे. पुणे, मुंबई पाठोपाठ ठाण्यातील ही रु ग्ण संख्या तृतीय क्र मांकावर आहे. पण मृतांमध्ये ठाणे जिल्ह्याचा प्रथम क्र मांक असल्याचे निदर्शनात आले आहे. गेल्या तीन दिवसांचा हा सणासुदीचा व विकेंडच्या कालावधीत तब्बल ५२ नव्या रु ग्णांची भर पडून जिल्ह्यात एकूण ४०२ रूग्णसंख्या झाली आहे. गेल्या चार दिवसत मृतांची संख्याही वाढल्यामुळे एकूण १४ स्वाईन फ्ल्यूमुळे दगावल्याचे निदर्शनात आले आहे.
सध्याच्या या पावसाळ्यातील पुढील काळही सणासुदीचा आहे. रक्षाबंधन, दहीहंडी नंतर आता लवकरच गणेशोत्सव हा भेटीगाठीच्या सणाचे आगमन होणार आहे. त्यामुळे स्वाईनच्या रूग्ण संख्येत भर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात या ४०२ रूग्णांपैकी आजरोजी १७० रु ग्णांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित बरे झाले आहेत. तर १४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. राज्यभरातील जिल्ह्यांच्या तुलनेत ठाण्यातील ही मृतांची संख्या सर्वात जास्त आहे. या मृतांमधील ठाण्यातील कौशल्य मेडिकल फौंडेशन, श्री महावीर जैन, डोंबिवलीतील ममता हॉस्पिटल आदी रूग्णालयात प्रत्येकी दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह ठाण्याचे बेथनी हॉस्पिटल, नोबल हॉस्पिटल, ठाणे हेल्थ केअर हॉस्पिटल आदी रूग्णालयांमध्ये स्वाइनच्या एका रूग्णाचा मृत्यू झालेला आहे.