शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

ठाणे जिल्ह्यात धुवाँधार... कोसळधार! आपत्कालीन यंत्रणा सज्ज, सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:19 AM

मंगळवारच्या धुवाँधार पावसाने ठाणे शहराला अक्षरश: झोडपले. दिवसभर सुरु असलेल्या या मुसळधार पावसामुळे २६ जुलै २००५ च्या आठवणी ताज्या झाल्या आणि ठाणेकरांच्या काळजाचा ठोकाच चुकला.

ठाणे : मंगळवारच्या धुवाँधार पावसाने ठाणे शहराला अक्षरश: झोडपले. दिवसभर सुरु असलेल्या या मुसळधार पावसामुळे २६ जुलै २००५ च्या आठवणी ताज्या झाल्या आणि ठाणेकरांच्या काळजाचा ठोकाच चुकला. कोपरी आणि कळवा येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. तर नौपाडा आणि घोडबंदर भागातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. शहरातील नाल्यांसह उपवन तलावही दुथडी भरुन वाहू लागला होता.सकाळी ७ ते दुपारी ३ या अवघ्या आठ तासांमध्ये शहरात ६४ मिली मीटर पावसाची नोंद झाली. दुपारी पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असे अपेक्षित असतांना जोर वाढल्यामुळे लोकमान्यनगर, रघुनाथनगर, वर्तकनगर, शास्त्रीनगर, नौपाडा, कोपरी, आनंदनगर, माजीवडा, किसननगर, वागळे इस्टेट, बाळकूम आणि वंदना सिनेमा, खोपट तसेच ठाणे महापालिका मुख्यालयासमोरील परिसर या सर्वच भागात मोठया प्रमाणात पाणी भरले होते. त्यामुळे वाहने हाकतांना चालकांची मोठी कसरत झाली होती. चरईतील धोबी आळीतील प्रार्थना फेनील इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या पायºया पाण्याखाली गेल्या होत्या. तर लोकमान्यनगरपाडा क्रमांक दोन येथे तीन फूट पाणी साचले होते. नौपाडा आणि घोडबंदर रोडवर वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु होती. शहरातील इंदिरानगर, लोकमान्यनगर, वर्तकनगर अशा अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. मुंब्रा परिसरातील कौसा, चांदनगर भागातीलही अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते.पालकमंत्र्यांनीघेतला आढावामुसळधार पावसाच्या तसेच समुद्राला येणाºया भरतीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन यंत्रणेचा आढावा घेतला. परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांनी सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याशी यासंदर्भात त्यांनी चर्चा केली.ठिकठिकाणचे रस्तेही गेले पाण्याखालीपावसामुळे कोरस रोडवरील दोस्ती रेन्टल, हरिनिवास सर्कल, कामगार हॉस्पिटल, रहेजा गार्डन आणि खेवरा सर्कल इत्यादी भागांमध्ये झाडे कोसळली. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालय, विष्णु नगर, जीवनतारा सोसायटी, दादोजी कोंडदेव स्टेडियम, हजुरी ग्रंथालय, स्टेशन रोडवरील संतोषी माता हॉल परिसरात झाडांच्या फांद्या कोसळल्या. झाडे कोसळणे, फांद्या तुटणे आणि ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. वागळे अग्निशमन केंद्राजवळील टिसा हाऊस, लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, भीमनगरातील विनायक सोसायटी, ज्ञानेश्वरनगर, जांभळीनाका, राजीव गांधी नगरातील प्रभाग १७, खोपटमधील गणपती व्हिला यासह अनेक भागांमध्ये पाणी साचले. सोसायट्यांच्या तळमजल्यावर गुडघाभर पाणी साचले. रस्त्यांवरही अशीच परिस्थिती असल्याने वाहतूक विस्कळीत झाली. खबरदारी म्हणून पालिकेच्या शिक्षण विभागाने मनपाच्या शाळांना दुपारनंतर सुटी दिली.ऐन सणासुदीत भाजीमंडईत शुकशुकाटठाणे : सोमवारी रात्रभर शहरात पावसाने थैमान घातले असताना याचा परिणाम भाजीमंडईच्या गर्दीवर झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात भाजीमंडईत मंगळवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. मात्र, या मुसळधार पावसाचा परिणाम भाज्यांचे दर आणि आवकवर झालेला नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत. सोमवारी रात्रीपासून पाऊस कोसळत आहेत. मंगळवारी पावसाने चांगलाच जोर पकडला आणि सर्वत्र थैमान घालण्यास सुरूवात केली. याचा परिणाम भाजीमंडईत दिसून आला. भाज्यांचे आवक सुरळीत होती आणि दरावरही काहीही परिणाम झाला नसल्याचे भाजी विक्रेते गणेश गायकवाड यांनी सांगितले. भाजी खरेदी करणारे ग्राहक मात्र मंडईत दिसले नाहीत. शुकशुकाटच असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गौरीचे आगमनाच्या दिवशी मंडईत भाज्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. मात्र, मंगळवारी हे चित्र उलट दिसून आले. विक्रेते हातावर हात ठेवून बसले होते. जांभळीनाका आणि गावदेवी मार्केट येथील भाजीमंडईत थंड प्रतिसाद दिसून आला. पावसामुळे ग्राहक भाजी खरेदीकडे वळले नसल्याचे विक्रेते म्हणाले.गणेशोत्सव मंडपातशिरले पाणीगणेशोत्सव मंडळांची मंगळवारच्या पावसामुळे फारशी गैरसोय झाली नसल्याचे काही पदाधिकाºयांनी सांगितले. पण काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. कमानी, देखाव्याला मात्र फटका बसला नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. परंतु, पावसामुळे गणपतीचे दर्शन घ्यायला येणाºया भाविकांची गर्दी मात्र चांगलीच ओसरल्याचे निरीक्षण मंडळाच्या एका पदाधिकाºयाने नोंदविले.दिवसभरात २२५ मिली मीटर पाऊसठाणे शहरात सायंकाळी ४.३० ते ५.३० या अवघ्या एक तासातच १४८ मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर संपूर्ण दिवसभरात २२५ मिली मीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.पाटीलवाडीतील ४० कुटूंबे उघड्यावरकामगार वसाहत तसेच नौपाड्यातील पाटीलवाडीतील ३० ते ४० कुटूंब घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे उघड्यावर आली. भास्करकॉलनीतील चिखलवाडी येथील तबेला भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचे हाल झाले. भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी कार्यकर्त्यांसह रहिवाशांना मदत केली.शहरातील प्रेमीयुगुलांचे आकर्षण असलेला उपवन तलावही पूर्णपणे भरुन वाहू लागल्यामुळे याठिकाणी काही काळ बघ्यांची गर्दी झाली होती.भिंती कोसळल्यामहापौरांचा प्रभाग असलेल्या मानपाड्यात आठ घरांच्या भिंती कोसळल्या, दोन जखमीनौपाड्यात अंतर्गत रस्त्यांवर सात फूट तर मानपाडा पोलीस ठाण्यासमोर ६ फूट पाणी होते.नौपाडा पोलीस ठाण्यासमोर झाड कोसळल्यामुळे या भागातील वाहतूक सायंकाळी काही काळ विस्कळीत झाली होती.तीन हात नाक्यावरील टीप टॉप हॉटेलकडून पावसात अडकलेल्या चाकरमान्यांसाठी मोफत चहा-नाष्टाची सोय करण्यात आली होती.पालघरमध्ये नदी किनाºयावरील गावांंना इशारापालघर : गत चार दिवसांपासून पडणाºया पावसाने मंगळवारी जिल्ह्याच्या काही भागामध्ये विश्रांती घेतली असली तरी वाडा, वसई, नालासोपारा, तलासरी, डहाणू आदिभागामध्ये संततधार आजही कायम होती. त्यामुळे पर्जन्यमान असलेल्या भागांमध्ये पुर सदृष्य स्थिती आहे. वाडा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येथील तानसा, वैतरणा, पिंजाळ, गारगावी व देहर्जे या नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. वैतरणा नदीकाठच्या गातेस, बोरांडा तर पिंजाळ नदीकाठच्या पिक, मलवाडा, पिंजाळ आश्रमशाळा व गावात दरवर्षी पुराचे पाणी गावात शिरून नुकसान होत असते. त्यामुळे या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तानसा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने धरणाचे काही दरवाजे उघडण्यात आले आहेत. तालुक्यातील चांबळे येथील चिकनपाडा, चेंबूर पाडा येथील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली असून भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाने वसई तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. तानसा धरणाचे दरवाजे उघडल्याने पांढरतारा, मेढे, शिरवली, पुल पाण्याखाली गेल्याने २१ गावांचा संपर्क तुटला आहे. तानसा नदीच्या काठावर वसलेल्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अंबाडी शिरसाड मार्गावर शिरवली, घाटेघर, सायवन, या ठिकाणी पुराचे पाणी भरल्याने या मार्गावरील वाहतुक ठप्प झाल्याने अनेक प्रवासी वाहने अडकून पडले तर वसईचा वाडा, भिवंडीशी संपर्क तूटल्याने नोकरदार वर्गाचे घरी परती साठी अनेक संकटाचा सामना करावा लागला.डहाणू तालुक्यात सोमवारी जोरदार पाऊस झाला असून चोवीस तासात १९३ मिमी नोंद झाली आहे. धामणी धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केला असून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उंची कमी करून धरणाचे पाच दरवाजे ६ इंच उघडे ठेवले आहेत. त्यामुळे धरणातून २८५० क्यूसेक्स पाणी सुर्या नदीत सोडण्यात येत आहे.झाली आहे. धामणी धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केला असून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उंची कमी करून धरणाचे पाच दरवाजे ६ इंच उघडे ठेवले आहेत. त्यामुळे धरणातून २८५० क्यूसेक्स पाणी सुर्या नदीत सोडण्यात येत आहे.शेकडो प्रवासी अडकलेठाणे : पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे शेकडो प्रवासी अनेक गाड्यांमध्ये चार ते पाच तास अडकले होते. तासनतास अडकून राहण्यापेक्षा काहींनी रेल्वे मार्गावरुनच घरी आणि कामावर जाणे पसंत केले.दुपारी १ वाजेपर्यंत काहीशा धीम्या गतीने सुरु असलेली रेल्वे सेवा दुपारी १.३० वाजेनंतर पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे ठाण्यातून मुंबईकडे जाणारी आणि कल्याण तसेच कर्जत कसाºयाकडे जाणाºया वाहतुकीवरही तिचा परिणाम झाला. दुपारपासून सायंकाळपर्यंत अनेक प्रवासी हे ठाणे, कळवा, दिवा, मुंब्रा, कोपर, डोंबिवली, ठाकूर्ली तसेच कल्याण येथील रेल्वे स्थानकांवर अडकले होते. त्यामुळे या सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. कल्याण डोंबिवलीतून ठाण्याकडे येण्यासाठी दुपारी बसलेले प्रवासी मुंब्रा आणि कळवा येथून रेल्वे मार्गातून कसेबसे ठाण्यापर्यत पोहचले. परंतु, त्यांना रिक्षा तसेच खासगी कार सेवेच्या लुटमारीचाही फटका बसला.केडीएमसीचा सतर्कतेचा इशाराकल्याण : मुंबईत

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकारThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका