डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील सुमारे ३० आधारकार्ड केंद्रे बंद करण्यात आली आहेत. त्यात डोंबिवलीतील तीन केंद्रांचा समावेश आहे. शालान्त आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आधारकार्ड सक्ती करण्यात आलेली आहे. सध्या परीक्षांचा काळ सुरू असून काही महिन्यांत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आधारकार्डची गरज भासणार आहे. केंद्र बंद झाल्याने आधारकार्ड काढणे, नावात बदल, मोबाइल क्रमांकात सुधारणा यांसारख्या दुरुस्ती करण्यात नागरिकांना अडचणी येत आहेत.जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आयुक्त, तसेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे शासकीय सचिव एकनाथ घागरे यांनी ही केंदे्र तात्काळ सुरू व्हावीत, यासाठी सरकारदरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र, त्याला अद्याप यश आलेले नाही.डोंबिवलीत महापालिकेच्या इमारतीत कैलास डोंगरे यांनी दीड वर्ष आधारकार्ड केंद्र चालवले. मात्र हे केंद्र बंद होणार असल्याची माहिती त्यांना तीन महिन्यांपूर्वीच मिळाली होती. त्याचबरोबर जिल्ह्यातील ३० केंदे्र बंद झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जानेवारीत केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र दिले होते.
ठाणे जिल्ह्यातील ३० आधारकार्ड केंद्रे बंद?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 3:28 AM