शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

ठाणे जिल्ह्याचा 86.63% निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 12:36 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावी परिक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला.

ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावी परिक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात ठाणे जिल्ह्याचा निकाल ८४.६३ टक्के तर शहराचा निकाल ८५.८६ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यासह शहरातही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यातून एकूण ९० हजार ४६१ विद्यार्थी बसले होते, पैकी ७६ हजार ५५६ विद्यार्थी पास झाले.दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावी परीक्षेत मुलींचीच सरशी दिसून आली. ठाणे जिल्ह्यातून ४७ हजार ७०५ मुले तर ४२ हजार ७५६ मुली बसल्या होत्या. त्यातून ३८ हजार ४३० मुले तर ३८ हजार १२६ मुली पास झाल्या. जिल्ह्यातून ८०. ५६ टक्के मुले तर ८९. १७ टक्के मुली पास झाल्या आहेत. ठाणे शहरातही मुली अग्रेसर राहिल्या आहेत. शहरातून १८ हजार ५११ विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी १५ हजार ८९४ विद्यार्थी पास झाले. यात पास झालेले विद्यार्थी ८००२ असून विद्याथीर्नी ७८९२ आहेत. शहरातून ८२. २७ टक्के मुले तर ८९.८५ टक्के मुली पास झाल्या आहेत.जिल्ह्यातून विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ७८४३ असून २४ हजार ७०० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, ३८ हजार ५३४ विद्यार्थ्यांनी द्वितीय तर ५४७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.व्यावसायिक शिक्षण घेणारे ८१८ विद्यार्थी बसले होते. ज्यात ५० विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य, २९२ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, ३१९ विद्यार्थ्यांना द्वितीय तर ११ विद्यार्थी फक्त उत्तीर्ण झाले आहे. हे शिक्षण घेणारे एकूण ६७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.>वाणिज्य शाखेतून ४७ हजार ७१८ विद्यार्थी बसले होते पैकी ५२४५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले. प्रथम श्रेणी मिळवलेले विद्यार्थी १४ हजार २४४, द्वितीय श्रेणी मिळवलेले १८ हजार ७०० तर फक्त उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ३३५४ आहेत. वाणिज्य शाखेतून ४१ हजार ५४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल कला शाखेतून १५ हजार ५५३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यात विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी ४१९, प्रथम श्रेणी मिळवलेले २६०७, द्वितीय श्रेणी मिळवलेले ७१३१ तर फक्त उत्तीर्ण झालेले विद्यार्थी १३१६ आहेत. कला शाखेतून ११ हजार ४७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल>विज्ञान शाखेतून २६ हजार ३७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या पैकी २१२९ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य, प्रथम श्रेणी मिळविलेले विद्यार्थी ७५५७, द्वितीय श्रेणी मिळवलेले विद्यार्थी १२ हजार ३८४ तर फक्त उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ७९८ आहेत. विज्ञान शाखेतून २२ हजार ८६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल 86.71% लागला आहे.बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत यंदा पुन्हा मुलींनी बाजी मारली. त्यामुळे ठाण्यात ठिकठिकाणी जल्लोषात मुली मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सर्व मैत्रिणींना घसघशीत मार्क मिळाल्यानंतरचा हा उत्साह.