शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

Thane: डॉ. श्रीकांत शिंदे यांची  वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड

By अनिकेत घमंडी | Published: October 28, 2023 10:05 PM

Shrikant Shinde: ''द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या'' (WIFA) कार्यकारी समितीच्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची  उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

- अनिकेत घमंडी डोंबिवली - भारतातील फुटबॉल खेळाचे नियमन करणाऱ्या नामांकीत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनशी संलग्न असलेल्या आणि महाराष्ट्रात फुटबॉलचे नियमन करणाऱ्या ''द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या'' (WIFA) कार्यकारी समितीच्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची  उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या  संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारी समितीच्या उपस्थिती शनिवारी मुंबईत  झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

''द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन ही संस्था भारतात फुटबॉल खेळाचे नियमन करणाऱ्या नामांकीत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनशी संलग्न आहे. तर,  महाराष्ट्रात फुटबॉलचे नियमन देखील या संस्थेमार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आणि देशात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळासाठी आवश्यक गोष्टींची उभारणी करण्यासाठी काम करणारी ही सर्वात जुनी संस्था असून १९११ पासून कार्यरत आहे. देशातील सर्वात जुनी दुसरी स्पर्धा असलेल्या रोव्हर्स कपची सुरुवात संस्थेच्या स्थापनेपूर्वीच झाली होती. राज्यातील फुटबॉल खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेमार्फत विविध ठिकाणी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

या स्पर्धांच्या माध्यमातून अनेक गुणवंत खेळाडूंना अनेक राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली आहे. या संघटनेच्या उपाध्यक्षपदी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. ''द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या'' (WIFA) कार्यकारी  समितीची शनिवारी मुंबई येथे बैठक पार पडली. या बैठकीत  संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारी समितीच्या उपस्थिती हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात आणि देशात फुटबॉलसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा आणि पोषक वातावरण निर्माण करण्यात नक्कीच योगदान देण्याचा प्रयत्न राहणार असून ग्रामीण भागातील खेळाडूंना फुटबॉलच्या मुख्य प्रवाहात आणण्याला प्राधान्य असल्याच्या भावना यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी  व्यक्त केल्या आहेत. 

या बैठकीला संघटनेचे उपाध्यक्ष छत्रपती मालोजीराजे, सुनील धांडे, विश्वजीत कदम, हरेश वोरा, किरण चौगुले, ए. सलीम परकोटे, सहसचिव आणि कार्यकारी समितीस सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेFootballफुटबॉल