शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

ठाण्यात महापौर नरेश म्हस्के यांच्या पुढाकारामुळे निवासी डॉक्टरांचा संप टळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 6:44 PM

कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून सेवा देणारे निवासी डॉक्टर हे त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे संपावर जाण्याच्या मनस्थितीत होते

ठाणे : कोविड काळात आपला जीव धोक्यात घालून सेवा देणारे निवासी डॉक्टर हे त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे संपावर जाण्याच्या मनस्थितीत होते, परंतु महापौर नरेश म्हस्के यांनी निवासी डॉक्टरांच्या मागण्या लक्षात घेवून आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याशी तात्काळ चर्चा केली व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करावी व फरकाची रक्कम देखील अदा करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.          राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर हे विद्यावेतनात वाढ करणेबाबत सतत  प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते, मात्र प्रशासनाकडून वेळेत कार्यवाही न झाल्याने या निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा प्रशासनास दिला होता. परंतु सद्यस्थिती विचारात घेता अशा प्रकारे डॉक्टरांनी संप पुकारु नये यासाठी महापौरांनी तात्काळ प्रशासनासोबत बैठक आयोजित केली व त्यांना देय असलेली वेतनवाढ तात्काळ लागू करावी असे आदेश दिले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, संजय हेरवाडे, उपायुक्त मुख्यालय मारुती खोडके, अधिष्ठाता भीमराव जाधव, वैद्यकीय अधिकारी वैजयंती देवगीकर तसेच निवासी डॉक्टर उपस्थित होते.कोविड 19 च्या काळात निवासी डॉक्टरांनी खूप चांगले काम केले आहे, ठाणे शहरातील सर्व कोरंटाईन सेंटर्स, ग्लोबल कोविड सेंटर तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातही या डॉक्टरांनी आपली सेवा बजावली असल्याचेही महापौरांनी यावेळी नमूद केले. आज जवळपास 160 निवासी डॉक्टर कार्यरत आहेत, या सर्व डॉक्टरांनी कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून सेवा दिलेली आहे, या निवासी डॉक्टरांना 46499 इतके विद्यावेतन देण्यात येत होते, या बैठकीमध्ये प्रशासनाची चर्चा करुन शासन निर्णयानुसार त्यांना आजपर्यत न देण्यात आलेली 10 हजारांची वाढ त्यांच्या मासिक विद्यावेतनात तात्काळ लागू करावी असा आदेश महापौरांनी दिला.मुंबईतील निवासी डॉक्टरांच्या धर्तीवर शासन निर्णयाचा अभ्यास करुन संबंधितांना योग्य विद्यावेतन मिळेल या दृष्टीकोनातून तातडीने कार्यवाही करावी अशीही सूचना यावेळी महापौर यांनी केली. तसेच या बैठकीत राजीव गांधी महाविद्यालयातील अन्य महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्यात आली. यामध्ये निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलची डागडुजी करणे, कँटीनमध्ये जेवणाची चांगली व्यवस्था करणे तसेच शासनाच्या निर्णयानुसार फी मध्ये सवलत देणेबाबत विचार करण्यात येईल असेही महापौरांनी या बैठकीदरम्यान नमूद केले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका