शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
3
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
5
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
6
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची पोस्ट, म्हणाला- ED लागेल की बडतर्फी होईल?
7
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
8
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
9
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
10
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
11
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
12
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
13
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
14
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
15
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
16
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
17
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
18
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
19
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?

ठाणे वनविभाने मुंबईतून जप्त केली २६ कोटींची व्हेलची उलटी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 11:43 PM

ठाणे वनविभाग आणि मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट दहाच्या पथकाने संयुक्तपणे मुंबई उपनगरातील अंधेरी आणि मालाड येथील कारवाईमध्ये व्हेल माशांच्या उलटीची तस्करी करणाऱ्या राजेश मिस्त्री याच्यासह पाच जणांना नुकतीच अटक केली.

ठळक मुद्दे पाच तस्करांना अटकगुन्हे शाखेच्या पोलिसांची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणेवनविभाग आणि मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट दहाच्या पथकाने संयुक्तपणे मुंबई उपनगरातील अंधेरी आणि मालाड येथील कारवाईमध्ये व्हेल माशांच्या उलटीची तस्करी करणाऱ्या राजेश मिस्त्री याच्यासह पाच जणांना नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून २६ कोटींची उलटी जप्त केली आहे.या व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीसाठी काही जण मालाड आणि अंधेरी येथे येणार असल्याची माहिती ठाणे वन विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे उप वनसंरक्षक गजेंद्र हिरे, सहायक वनसंरक्षक गिरीजा देसाई यांच्यामार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, वन अधिकारी प्रशांत देशमुख, शहापूरचे वनपाल रवींद्र तवर, नारायण माने, गणेश परहर आणि रामा भांगरे आदींच्या पथकाने १० जुलै २०२१ रोजी मालाड येथून राजेश मिस्त्री, दिवाकर शेट्टी, दादाभाई घनवट आणि किरीटभाई वडवाना यांना सुमारे आठ किलोच्या उलटीसह अटक केली. तर दुसºया कारवाईमध्ये सईद सिंबगथुल्ला (रा. कर्नाटक) याला १८ किलो ग्रॅम व्हेल माशाची विक्री करतांना रंगेहाथ पकडले. या पाचही जणांना दोन दिवसांची वनकोठडी न्यायालयाने सुनावली आहे.* व्हेल माशाची उलटी अतिशय दुर्मिळ मानली जाते. भारतीय बाजारपेठेत एक किलो उलटीची किंमत एक कोटी रु पये असल्याचे सांगितले जाते. तर आखाती देशात विशेष करून दुबई, इंग्लंड आणि अमेरिका या देशांमध्ये व्हेल माशाच्या उलटीला मोठी मागणी आहे. आंतरराष्टÑीय बाजारपेठेमध्ये एक किलो उलटीची किंमत तीन ते पाच कोटींपर्यंत सांगितली जाते.* विशेष म्हणजे व्हेल माशाची ही उलटी समुद्राच्या पाण्यात बुडत नसून समुद्रातील क्षारामुळे ती खाºया पाण्यावर तरंगते आणि गोळा होऊन वर्षभराचा प्रवास करून समुद्रकिनाºयावर येते.*यासाठी होते तस्करी...या माशाच्या उलटीचा वापर उच्च प्रतीचा परफ्युम तयार करण्यासाठी तसेच काही ठिकाणी औषध निर्मितीमध्ये होतो. काही ठिकाणी सिगारेट , मद्य आणि खाद्य पदार्थामध्ये स्वाद वाढविण्यासाठी देखील केला जातो. याची खरेदी विक्र ी करणे हे वन्य प्राणी सुरक्षा अधिनियम अंतर्गत बेकायदेशीर आहे. तरीही त्याची मोठया प्रमाणात तस्करी केली जाते, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभाग