शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Thane: ननावरे पती-पत्नी आत्महत्या प्रकरणी शिवसेना आमदारांच्या स्वीय सहायक साठेसह चौघांना अटक

By सदानंद नाईक | Updated: August 19, 2023 19:37 IST

Ulhasnagar: नंदू ननावरे पतीपत्नी आत्महत्येला तीन आठवड्याचा कालावधी उलटूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ भाऊ धनंजय ननावरे यांनी हाताचे बोट कापून गृहमंत्र्यांना भेट देणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यावर, पोलीस कामाला लागून मूळ एफआरआय मध्ये नाव नसलेल्या शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांच्या स्वीयसहायक शशिकांत साठे यांच्यासह चौघांना अटक केली.

- सदानंद नाईक उल्हासनगर - नंदू ननावरे पतीपत्नी आत्महत्येला तीन आठवड्याचा कालावधी उलटूनही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ भाऊ धनंजय ननावरे यांनी हाताचे बोट कापून गृहमंत्र्यांना भेट देणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यावर, पोलीस कामाला लागून मूळ एफआरआय मध्ये नाव नसलेल्या शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांच्या स्वीयसहायक शशिकांत साठे यांच्यासह चौघांना अटक केली.

 उल्हासनगर कॅम्प नं-४, आशेळेपाडा येथे राहणारे नंदू ननावरे यांनी माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीयसहायक म्हणून काम केले. तसेच माजी आमदार पप्पु कलानी व शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांचे मंत्रालयातील कामे करीत होते. असे बोलले जाते. १ ऑगस्ट रोजी दुपारी पत्नीसह राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून ननावरे यांनी उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी पतीपत्नीने एक व्हिडिओ काढून विशिष्ठ नागरिकांना पाठविला. त्यामध्ये आत्महत्यास रणजितसिंह नाईक निंबाळकर, संग्राम निकाळजे व दोघा देशमुख वकील बंधूंचा उल्लेख आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात या चौघावर गुन्हा दाखल झाला आहे. 

ननावरे पतीपत्नीवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर, नातेवाईक व भाऊ धनंजय समोर घराची झाडाझडती घेतली असता, व्हिडीओ व्हायरल झाल्याचा पेन ड्राइव्ह व एक चिट्टी मिळाली होती. आरोपीवर कारवाई संदर्भात धनंजय ननावरे यांच्यासह नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या चकरा मारूनही कोणतीच कारवाई झाली नाही. दरम्यान गुन्हा खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग केला. आरोपीवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ भाऊ धनंजय ननावरे याने हाताचे बोट कापले. असे शरीराचे अवयव दर आठवड्याला कापून गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना दान देणार असल्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याने, एकच खळबळ उडाली. खंडणी विरोधीन पथकाने, शुक्रवारी रात्री चिट्टीत नाव असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार किणीकर यांचे स्वीयसहायक शशिकांत साठे, पप्पु कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम, नरेश गायकवाड व गणपती कांबळे यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २४ आगस्ट पर्यन्त पोलीस कस्टडी दिल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख मालोजी शिंदे यांनी दिली आहे.

२८ ऑगस्ट पर्यंत बेलवर? ननावरे आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या रणजितसिंग नाईक निंबाळकर, देशमुख बंधू व संग्राम निकाळजे यांनी २८ ऑगस्ट प्रयत्न न्यायालयातून अटकपूर्व बेल आणल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली. ती रद्द केल्यानंतर कारवाईचे संकेत दिले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर