ठाणे - वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी आयुष्यातील एक मानाचा तुरा रोवला गेला तो मातृभूमीपासून दूर आणि जगातील सर्वात उंच एका शिखरावर ठाण्यातील ग्रिहिथा विचारे हिच्या शिरपेचात. ग्रिहिथाच्या दक्षिण आफ्रिकेच्या मोहिमेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी ग्रिहिताच्या हातात तिरंगा सुपूर्द करुन तिच्या या धाडसी मोहिमेचे कौतुक केले.
जगातील सर्वात उंच शिखर म्हटलं तर आठवतो तो म्हणजे माउंट एव्हरेस्ट. पण एव्हरेस्ट हा हिमालयाच्या पर्वत रांगेतील एक उंच शिखर आहे. आणि जगातील सर्वात उंच शिखर (स्टॅंड अलोन माऊंटन म्हणून आहे तो दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील माउंट किलीमांजारो (Kilimanjaro) ज्याची उंची समुद्र सपाटी पासून ५८९५ मीटर इतकी आहे. ग्रिहिथा विचारे हिने हा ट्रेकिंग मरांगू गेट (१८७९ मीटर)-मंदारा हट (२७२० मीटर)-होरोम्बो हट (३७२० मीटर) किबो हट (४७२० मीटर) गिलमन्स (५६८५ मीटर) उहुरु शिखर मार्गे केला आहे.
महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख असलेली ग्रिहिथा विचारे हिने भारताचा तिरंगा ह्याच माउंट किलीमांजारो वरून फडकवत भारताच नाव मोठे केले आहे. हा मार्ग ट्रेकर्सना क्लासिक किलीमांजारो गिर्यारोहणाचा अनुभव प्रदान करतो, उहुरु शिखराच्या शिखरापर्यंत सर्व मार्गाने विलोभनीय दृश्ये आणि एक अद्भुत हायकिंग साहस प्रदान करतो. ग्रिहिथाच्या ह्या उत्तुंग कामगिरीने आज ती जगाच्या सर्वात उंच शिखर माऊंट किलीमांजारो वर भारतीय तिरंगा फडकवणारी सर्वात कमी वयाची म्हणजेच फक्त ९ वर्षांची भारतीय होण्याचा मान मिळवला आहे. अजूनही कित्येक मानांकने ह्या चिमूकलीच्या नावे होणे बाकी आहे आणि त्याची आखणी देखील सुरू आहे. या उत्तुंग कामगिरी करणाऱ्या ग्रिहिथाला सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे