लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाने ११ जिल्हे वगळता इतर ठिकाणी ब्रेक द चेनचे नियम लागू केल्यानंतर मंगळवारी ठाणे महापालिकेने देखील ब्रेक द चेनची नियमावली जाहीर केली. त्यानुसार ठाण्यात ३ ऑगस्ट र्निबध शिथील करण्यात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. त्यानुसार आता ठाणे महापालिका हद्दीत अत्यावश्यक सेवेसह इतर दुकाने देखील आता रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. परंतु रविवारी मात्र अत्यावश्यक वगळता इतर दुकाने बंद असणार आहेत. तसेच मॉल्स सुरु करण्याला परवानगी देण्यात आलेली नाही. काय सुरु राहीलअत्यावश्यक सह इतर दुकाने सोमवार ते शनिवार रात्री १० वाजेर्पयत सुरु राहणार, मेडीकल, केमीस्ट शॉप सुरु राहणार, ५० टक्के क्षमतेने हॉटेल दुपारी ४ वाजेर्पयत सुरु राहणार, हॉटेलमधील पार्सल सेवा सुरु राहणार, व्यायमशाळा, केश कर्तनालये, योग वर्ग, स्पॉ, ब्युटी पार्लर ५० टक्के क्षमतेने सोमवार ते शनिवार, सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ अशा वेळेत सुरु राहतील, शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरु, चित्रिकरण नियमित वेळेनुसार सुरु राहणार, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थिती मर्यादा, अंत्यविधीसाठी २० नागरीक, लग्न सोहळे ५० नागरीकांच्या उपस्थितीत, सार्वजनिक वाहतुक १०० टक्के क्षमतेने सुरु मात्र उभे राहून प्रवास करण्यास बंदी. जलतरण तलाव आणि निकट संपर्क येईल असे क्रिडा प्रकार वगळून अन्य इनडोअर व आऊटडोअर खेळांस यापूर्वी नियमित केलेल्या वेळेनुसार परवानगी असेल. काय बंद राहीलअत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने ही रविवारी पूर्ण वेळ बंद राहणार, रविवारी हॉटेल बंद राहणार, व्यायमशाळा, केश कर्तनालये, योग वर्ग, स्पॉ, ब्युटी पार्लर रविवारी बंद राहणार, धार्मिक स्थळे, लोकल प्रवास बंद राहणार आहे. सिनेमागृहे, नाटय़गृहे, व मल्टीप्लेक्स बंद राहणार.
ऑर्डर येताच पुन्हा शटर झाले ओपनराज्य शासनाकडून जरी ठाण्यासह जिल्ह्याचे चित्र स्पष्ट करण्यात आले होते. तरी देखील त्याची अंमलबजावणी कशी करावी याचे अधिकारी स्थानिक संस्थांना देण्यात आले होते. त्यानुसार, मंगळवारी होणाऱ्या बैठकीनंतरच ठाण्यासह इतर भागांचे चित्र स्पष्ट होणार होते. त्यामुळे मंगळवारी दुपारी ४ नंतर ठाण्यातील अत्यावश्यक सेवेतील वगळून इतर दुकाने बंद करण्यात आली होती. परंतु जशी ऑर्डर आली तशी ठाण्यातील सर्वच दुकाने पुन्हा सुरु करण्यात आल्याचे चित्र दिसून आले. ठाण्याचे एकूण चित्रकोरोनाचे एकूण रूग्ण - १३५८४६बरे झालेले रूग्ण - १३३२०४एकूण मृत्यू -२०६६सध्या उपचार घेत असलेले रूग्ण - ५७६सध्याचा पॉझटिव्हिटी रेट - ७.४०