करपे यांच्याकडे ‘ग’ प्रभागाचा कार्यभार होता. परंतु, सध्या त्या रजेवर आहेत. तर, नियुक्तीनंतर सुरुवातीला ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी राहिलेल्या करचे यांची सहायक आयुक्त म्हणून सामान्य प्रशासन विभागात नुकतीच नेमणूक केली आहे. तर, धाट यांच्याकडील परिवहन व्यवस्थापक विभागाचा कार्यभार सोपविला होता. मनपाचे कुलकर्णी हे करनिर्धारक संकलक विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत.
महापालिकेकडे सहायक दर्जाच्या अधिकाऱ्यांची पूर्वी वानवा होती. त्यामुळे वरिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, लेखापाल, अधीक्षकपदावर असलेल्यांना प्रभाग अधिकारीपद देऊन कार्यभार चालविला जात होता. परंतु, गेल्या वर्षभरात प्रतिनियुक्तीने सहायक दर्जाचे अधिकारी मोठ्या प्रमाणात आले आहेत. परंतु, काही अपवाद वगळता इतरांना प्रभाग क्षेत्राची जबाबदारी न देण्यामागचे नेमके प्रयोजन काय, असा सवाल अदलाबदलीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहे.
-------