- सुरेश लोखंडेठाणे - भिवंडीच्या बी ए राऊत विद्यालय- पाच्चापूर व खांबाला विभाग हायस्कूल ,खांबाला या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी मासिक पाळी विषयीच्या आराेग्य विषयक मार्गदर्शनासह त्याविषयीचे समज-गैरसमज, दरम्यानची स्वच्छता व आहार, वयात येताना होणारे शारीरिक बदल या विषयीचे सखाेल मार्गदर्शन गणेशपुरी येथील प्रसाद चिकित्सा या धर्मदाय संस्थेकडून अलिकडेच देण्यात आले.
भिवंडी तालुक्यातील या शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या आराेग्याची माेफत काळजी या प्रवाद चिकित्सालयाकडून घेतली जात आहे. महाविद्यालयासह विद्यालतया शुक्रवारी झालेल्या या आराेग्य शिबिराव्दारे समुपदेशकांनी तब्बल २५० विद्यार्थिनींना आराेग्याचे धडे देऊन त्यांच्या शंकांचे निरसण केले आहे. यावेळी या धर्मदाय संस्थेमार्फत ६३० सॅनीटरी पॅडही माेफत वाटप करण्यात आले आहे. गणेशपुरी येथील प्रसाद चिकीत्साही धर्मदाय संस्था गेल्या दहा दशकांपासून तानसा खोऱ्या मध्ये आराेग्य विषयक जनजागृती करीत आहे. या परिसराचा तानसा खोऱ्याचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्दिष्टाने विविध उपक्रम राबवीत आहे. यामध्ये आरोग्याच्या विविध सुविधा गरीबांना, गरजू लोकांना दिल्या जात आहे. आरोग्य विषयक जनजागृती शाळा, महाविद्यालये ,अंगणवाडी इत्यादी ठिकाणी केली जात आहे.