शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

Thane: उल्हासनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात, जलवाहिन्या सांडपाण्याच्या नाल्यातून 

By सदानंद नाईक | Published: July 17, 2024 7:00 PM

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरवासीयांना मुबलक शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी ३५० कोटींची पाणी वितरण योजना महापालिकेने राबवूनही जलवाहिन्या सांडपाण्याच्या गटारीतून गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला.

- सदानंद नाईक उल्हासनगर -  शहरवासीयांना मुबलक शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी ३५० कोटींची पाणी वितरण योजना महापालिकेने राबवूनही जलवाहिन्या सांडपाण्याच्या गटारीतून गेल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील १२६ कोटीच्या पाणी पुरवठा वितरण योजनेला मुहूर्त मिळाला आहे. 

उल्हासनगरातील पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी ३५० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना काही वर्षांपूर्वी राबविली. या योजने अंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकणे, प्रत्येक घराला नवीन ब्ल्यू पाईपचे नळजोडणी देणे, पाणी मीटर बसविणे, पाणी वितरणासाठी ११ उंच जलकुंभ व एक भूमिगत जलकुंभ उभारणे, पंपिंग स्टेशन आदींचा समावेश होता. मात्र या योजनेतून काही भाग सुटल्याने, दुसऱ्या टप्प्यातील १२६ कोटींची पाणी पुरवठा वितरण योजनेचे काम सुरू आले. मात्र अवघ्या १३ कि.मी. क्षेत्रफळाच्या शहरात पहिल्या टप्प्याची ३५० कोटींची पाणी पुरवठा वितरण योजना राबवूनही पाणी टंचाई, पाणी गळती, अनियमित पाणी पुरवठा आदी समस्या कायम आहे.

 कॅम्प नं-३ हिराघाट परिसर, शिरू चौक, सुभाष टेकडी परिसर, गायकवाड पाडा, गोलमैदान येथील राहुलनगर परिसर, शांतीनगर येथील डॉल्फिन हॉटेल परिसर, कॅम्प नं-४ येथील महादेवनगर, संतोषनगर, भीम कॉलनी, मद्रासीपाडा आदी विविध भागात प्रत्येकाच्या घरापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आल्या नाहीत. त्यामुळे मुख्य जलवाहिनीवरून लांब पाईप टाकून नळजोडणी घेण्यात आल्या आहेत. गटारी, सांडपाण्याच्या नाल्यातून जाणाऱ्या या पाईपलाईनला गळती लागली असून अश्या गळक्या पाईप मधून नागरिकांना प्रदूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. अश्या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

 कोट्यवधींच्या योजना कोणासाठी नागरिकांना स्वच्छ, नियमित व मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी महापालिका केंद्राच्या अमृत योजने खाली कोट्यवधींचा पाणी पुरवठा वितरण योजना राबविते. मात्र त्याचा फायदा नागरिकांना होत नसल्याने, ह्या योजना कोणासाठी राबवितात. असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणी