लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असतांनाच गुरुवारी ठाणो शहराचा पारा पुन्हा ४४.२ अशांवर गेला. त्यामुळे ठाणोकर चांगलेच हैराण झाले होते. सकाळी ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडले या आशेवर ठाणोकर होते. मात्र अवघ्या काही तासातच ठाण्याचा पारा चढल्याने ठाणेकरांना पावसासाठी काढलेल्या छत्रीचा वापर हा उन्हापासून बचाव करण्यासाठी केल्याचे दिसून आले. हवामान विभागाने चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यातही सकाळचे वातावरण हे ढगाळ असल्याने पाऊस पडण्याची शक्यता बुधवारी आणि गुरुवारी देखील दिसून आली. मात्र ठाण्यात या दोनही दिवशी उन्हाचा पारा चढल्याचे दिसून आले आहे. त्यात गुरुवारी सकाळ पासूनच वातवरणात उष्णता जाणवत होती. तर, दुपारी हा पारा थेट ४४.२ अशांवर गेल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत होती. अनेकांच्या डोळ्यावर गॉगल, डोक्यावर टोपी दिसून आली. चाकरमान्यांनी आपला मोर्चा ताकाच्या गाड्यांवर तर, काहींनी नारळ पाणी, लिंबू सरबतीच्या गाडीवर वळविला असल्याचे दिसून आले.ठाण्यात सकाळच्या सत्रत म्हणजेच ९.३० वाजता ३३ अंश सेल्सीअस तापमान होते. त्यात ११.३० वाजता वाढ होऊन ३८.६ वर पारा गेला. त्यानंतर १२.३० वाजता त्यात आणखी वाढ होऊन तापमान ४१.९ अंशावर गेले. तर दुपारी अडीच वाजता हेच तापमान ४४.२ अंशावर गेल्याचे दिसून आले. मागील महिन्यात म्हणजेच मार्च मध्ये तापमानाचा पारा हा ४४ च्या पार झाल्याचे दिसून आले होते. त्यात एप्रिल महिन्यात आता पुन्हा ठाण्यातील पारा चढल्याचे दिसून आले.
ठाण्याचा पारा पुन्हा चढला; ४४.२ अंशावर गेला पारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 7:28 PM