ठाणे - मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु आॅक्टोबर हीट तडका सप्टेंबर अखेर पासूनच ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. आता तर आॅक्टोबर हीटच्या झळा अधिक तीव्र झाल्याने ठाणेकर वाढत्या उष्म्याने हैराण झाले आहेत. गुरु वारी ठाणे शहराचा पारा ३६ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद झाली आहे. ठाण्यात जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नागरिक सुखावले होते. परंतु पुढे आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने जवळपास दडीच मारली होती. सप्टेंबर महिन्यात तर ठाण्यात जवळपास पाऊस गायबच झाला. पावसाळा जवळपास संपलाच असल्याने हवेतील उष्मा आता वाढत आहे. नागरिक या वाढत्या उष्म्याने चांगलेच हैराण झाले आहेत. आॅक्टोबर महिन्याच्या पाहिल्या आठवड्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. गुरु वारी तर दिवसभर ठाणे शहरात प्रचंड उष्मा वाढला होता. नागरीक उष्णनेते हैराण झाले होते. ठाण्यात आॅक्टोबर हिटच्या झळा बसत आहेत गुरु वारी ठाणे शहराचे कमान तापमान ३६ अंश आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअस इतके होते. दिवसभर सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्यावेळी नागरिकांनी बाहेर पडणे टाळले होते. मागील तीन महिन्यापासून पावसासाठी बाहेर काढलेल्या छत्र्या गुरु वारी उन्हापासून बचावासाठी वापरण्यात आल्या. लिंबू पाणी विक्र ेते आणि उसाच्या रसाच्या विक्रेत्यांकडे नागरिकांची गर्दी दिसून आली. आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा पोहचू लागल्याने पुढील महिन्यात आणखीन उष्मा वाढण्याची शक्यता आता वर्तविण्यात येत आहे.
ठाण्यात उन्हाचा पारा वाढला, तापमान गेले ३६ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 6:16 PM
आॅक्टोबर महिना सुरु झाला आणि ठाण्यात उष्णतेच्या झळा वाढू लागल्या आहेत. गुरुवारी ठाण्याचे तापमान ३६ अंशांवर गेले होते.
ठळक मुद्देनागरीक करीत आहेत छत्र्यांचा वापरआॅक्टोबर हीटने ठाणेकर हैराण