ठाणे : गाडीला धक्का लागल्याचा बहाणा करुन चार जणांच्याा एका टोळक्याने वसईतील महंमदवल्ली शेख (४३) या कामगारांच्या ठेकेदाराला लुटल्याची घटना ठाण्यात शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी कासारवडली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कामगारांच्या पगाराचे पैसे देण्यासाठी ठेकेदार शेख यांनी वसईच्या एका बँकेतून शनिवारी सकाळी सात लाखांची रोकड काढली होती. यामध्ये स्वत:कडील एक लाख रुपये टाकून ते गोवंडीतील सतरा ग्रृपच्या नॉर्थ कन्स्ट्रक्शनच्या साईडवरील कामगारांना देण्यासाठी ते दुचाकीवरुन घोडबंदर रोडने १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.५० वाजण्याच्या सुमारास जात होते. ते गायमुखवरुन ठाण्याच्या दिशेने येत असतांना शिवमंदिराच्या जवळ दोन वेगवेगळया दुचाकीवरुन आलेल्या चौघा जणांच्या एका टोळक्यापैकी एकाने ‘मेरे गाडीको टच क्यूं किया’ असा बहाणा करीत त्यांना आधी शिवीगाळ केली. नंतर दमदाटी करुन त्यांच्याकडील आठ लाखांची रोकड असलेली बॅग गळयातून खेचून त्यांनी पलायन केले. त्यांनी याप्रकरणी १८ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. कासारवडवली पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकही या प्रकरणाचा तपास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाण्यातील घटना: गाडीला धक्का लागल्याचा बहाणा करुन आठ लाखांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 7:59 PM
ठाणे : गाडीला धक्का लागल्याचा बहाणा करुन चार जणांच्याा एका टोळक्याने वसईतील महंमदवल्ली शेख (४३) या कामगारांच्या ठेकेदाराला लुटल्याची घटना ठाण्यात शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी कासारवडली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कामगारांच्या पगाराचे पैसे देण्यासाठी ठेकेदार शेख यांनी वसईच्या एका बँकेतून शनिवारी सकाळी सात लाखांची रोकड काढली होती. यामध्ये ...
ठळक मुद्देकामगारांच्या पगाराची रक्कम लुबाडलीघोडबंदर मार्गावर घडला प्रकारदुचाकीवरील चौघांनी केली लूट