- पंकज रोडेकर ठाणे : दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी होणारा त्रास कमी करण्यासाठी शासनाने ठाणे आणि नवी मुंबई महापालिकांना कार्यक्षेत्रातील रुग्णालयात केंद्र सुरू करण्याबाबत एक शासन निर्णय जारी करून दिव्यांगांना दिलासा दिला होता. मात्र, निर्णयाची वर्षपूर्ती झाली, तरी अद्यापही या दोन्ही महापालिकांनी ते सुरू केलेले नाही. त्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.जिल्हा सामान्य रु ग्णालय आणि उल्हासनगर मध्यवर्ती रु ग्णालय या दोन रुग्णालयांमध्ये जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र दिले जात आहे. या रु ग्णालयात आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी साधारणत: १५० दिव्यांग व्यक्तींना त्याचे वाटप होते. मात्र, बऱ्याच वेळा वीजपुरवठा खंडित होणे, नेटची समस्या उद्भवणे आदी समस्यांमुळे ते देण्यात काही वेळा विलंबही होतो. यावर उपाय म्हणून शासनाने १७ आॅक्टोबर २०१७ रोजी शासन निर्णयाद्वारे ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा, तर लोकमान्य रु ग्णालय ओरस आणि नवी मुंबई महापालिकेच्या जनरल हॉस्पिटल यांना त्यांच्या कार्यक्षेत्रापुरते दिव्यांग प्रमाणपत्र प्रदान करण्याचे अधिकार दिले आहेत. याचदरम्यान दोन्ही महापालिकांच्या डॉक्टर आणि कर्मचाºयांनी तत्कालीन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांच्या कालावधीत हे प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशिक्षण घेतले आहे. शासन निर्णय काढून एक वर्षाचा कालावधी उलटूनही अद्याप या रु ग्णालयांमध्ये दिव्यांग प्रमाणपत्र प्रदान करण्याची प्रक्रि या सुरू झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रु ग्णालयांसह उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयावर याचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातून येणाºया दिव्यांगांना नाहक त्रास तर होताच, त्याचबरोबर वेळ आणि पैसाही खर्च होत असे.दिव्यांग प्रमाणपत्र देण्याबाबत त्या महापालिकांना जिल्हा रुग्णालयात तसेच नुकतेच नाशिक येथे नव्या यूडीआयडी प्रणालीद्वारे प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशिक्षण घेतले आहे. त्या दोन्ही महापालिकांमध्ये हे केंद्र सुरू झाल्यावर दिव्यांग व्यक्तींना होणारा त्रास कमी होईल.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे जिल्हा रुग्णालयमहापालिकेच्या कळवा आणि लोकमान्यनगर येथील रुग्णालयात लवकरच हे केंद्र सुरू होईल. यासाठी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम लागत असल्याने त्याबाबत बैठक बोलावली आहे. तसेच, केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया दोन्ही रुग्णालयांत शेवटच्याटप्प्यात आहे.- डॉ. आर.टी. केंद्रे, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ठाणे महापालिकायाबाबत पूर्ण तयार झाली आहे. तसेच संगणकीय प्रणालीद्वारे दिले जाणाºया प्रमाणपत्रांसाठी लागणाºया सॉफ्टवेअरचा पासवर्ड आणि युझर आयडी याबाबत शासनाकडे माहिती मागवली आहे. ती मिळाल्यानंतर तातडीने हे केंद्र सुरू करण्यात येईल. - दयानंद कटके, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नवी मुंबई महापालिका
दिव्यांग प्रमाणपत्र केंद्र सुरू करण्यात ठाणे उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:03 AM