शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

ठाणे लोकसभेच्या सहा मतदारसंघांत ३३ हजार ६०९ मतदारांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:50 PM

मतदार नोंदणीस प्रतिसाद; ओवळा - माजिवडा मतदारसंघात सर्वाधिक नोंदणी

ठाणे : लोकसभेपाठोपाठ लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मतदारांची नव्याने नोंद केली त्यानुसार ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघात ३३ हजार ६०९ नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वाधीक मतदारांची नोंद ही ओवळा-माजिवडा या मतदारसंघात ९ हजार ३३७ इतकी झाली आहे. या नव मतदारांचा फायदा कोणात्या पक्षाला आणि कोणत्या उमेदवाराला होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.ठाणे जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ७० नवीन मतदारांची तर १० तृतियपंथीची नोंद झाली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नवमतदार व कोणतीही व्यक्ती मतदानासारख्या पवित्र हक्का पासून वंचित राहू नये याकरीता निवडणूक विभागाकडून ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघात नवीन मतदारनोंदणी कार्यक्र म राबविला. त्यादेखील मोठा प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यात ९९ हजार २८५ इतक्या नव्या मतदारांची नोंद झाली. यामध्ये २० ते २९ या वयोगटातील सर्वाधिक ३५ हजार ३११ नवीन मतदारांची नोंद करण्यात आली आहे. तर, ८० व त्या पुढील वयोगटातील मतदरांच्या संख्येत ११९ ने घट झाल्याचे आकडेवारी वरून दिसून येत आहे. १८ ते १९ वयोगटातील मतदारंच्या संख्येत १४ हजार ३४५ ने वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीत हे मतदार पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.ठाणे लोकसभा मतदारसंघात २४ लाख ३ हजार ९३७ मतदारलोकसभा निवडणुकीच्यावेळी ठाणेलोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा मतदारसंघात २३ लाख ७० हजार २७३ मतदारांची नोंद झाली होती. तर आता राबविलेल्या नवीन मतदारनोंदणी मोहिमेत ३३ हजार ६०९ मतदारांची नव्याने वाढ झाली आहे. यामुळे ठाणे लोकसभेच्या मतदारांची संख्या २४ लाख ३ हजार ९३७ इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ९ हजार ३३७ इतकी झाली आहे. त्याखालोखाल मीराभार्इंदर मतदारसंघात ६ हजार ८०१ मतदारंची वाढ झाली आहे. तर, सर्वातकमी ३ हजार ३७८ इतकी ऐरोली विधानसभा मतदार संघात वाढ झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.शहापुरात सुमारे अडिच लाख मतदार शहापूर : सुमारे तीन लाख लोकसंख्येच्या शहापूर विधानसभा मतदारसंघात २0१९ च्या मतदारयादीनुसार २ लाख ४८ हजार ७0८ मतदार आहेत. यामध्ये महिला १ लाख १७ हजार ९३३, तर पुरुष १ लाख ३0 हजार ७७५ असल्याची माहिती अति. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार निलिमा सूर्यवंशी यांनी दिली.या मतदारसंघातील २२६ गावे व २६५ पाड्यांमध्ये १0८ ग्रामपंचायती व २ ग्रामदान मंडळे आहेत. ३२६ मतदान केंद्र असून जवळपास २५00 कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी आवश्यकता आहे. मतदान अधिकारी १ ते ३ अशी वर्गवारी करून निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना जोंधळे कॉलेज शहापूर-आसनगाव येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शहापुरातील वन प्रशिक्षण विद्यालयात निवडणूक कार्यालय तयार करण्यात आले आहे. तालुक्यात एकही संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जयराज कारभारी हे काम पाहणार आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार निलिमा सूर्यवंशी, गटविकास अधिकारी अशोक भवारी व भूमिअभिलेख अधिकारी राजेंद्र लोंढे हे काम पाहणार आहेत.डोंबिवली मतदारसंघात वाढले 9000मतदारडोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात ३१ आॅगस्टपर्यंत प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार तीन लाख ५१ हजार ५२६ मतदार आहेत. त्यापैकी एक लाख ८१ हजार ६८१ पुरुष, तर एक लाख ६९ हजार ८४५ महिला मतदार आहेत. डोंबिवलीत एकूण ३२३ मतदान केंद्रे असून, ३०३ मूळ आणि २० सहाय्यकारी मतदान केंद्रे असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयराम पवार यांनी दिली.लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आता नऊ हजार मतदार वाढले आहेत, असेही ते म्हणाले. डोंबिवली मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी गजेंद्र पाटोळे, अरुण वानखेडे आदी उपस्थित होते.सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर आहेत. मतदान केंद्रांसाठी एकूण ६१ इमारती निवडल्या असून, त्यामध्ये ३२३ मतदान केंद्रे असतील. तसेच निमशासकीय ५६ तर २६७ खासगी इमारतींचा त्यात समावेश असेल, असे पवार म्हणाले. लोकसभेप्रमाणेच स. वा. जोशी हायस्कूल हे महिला मतदारांसाठी राखीव मतदार केंद्र असेल. तेथे अधिकारीपदापासून कनिष्ठ पदापर्यंत महिला कर्मचारी कार्यरत असतील.अधिकारी, कर्मचाºयांसाठी टपाल मतपत्रिकेची सुविधा असेल. आतापर्यंत या मतदार संघात ६४ सैनिक मतदारांच्या नावांची नोंद झाली आहे. फुले नाट्यमंदिरातच स्ट्राँग रूम असून, मतमोजणी येथे होणार आहे. मतदान केंद्रासाठीचे साहित्य वाटपही तेथूनच केले जाणार आहे. या ठिकाणी एकूण दोन हजार ५५३ अधिकारी, कर्मचारी कार्यरत राहणार असून त्यात ३५७ पोलीस कर्मचारीही आहेत, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019