शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

ठाणे मनपाने केली शासनाची दिशाभूल

By admin | Published: March 21, 2016 1:26 AM

ठाणे महापालिकेने अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळावी म्हणून शासनाला त्यांच्या कामाचा एक अहवाल सादर केला

ठाणे : ठाणे महापालिकेने अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळावी म्हणून शासनाला त्यांच्या कामाचा एक अहवाल सादर केला. या अहवालात पाच लाख वृक्षलागवडीच्या पहिल्या टप्प्यात ४५ हजार वृक्ष लावल्याची माहिती जिओ टॅगवर दिल्याचा उल्लेख आहे. परंतु, शहरात प्रत्यक्षात तेवढे वृक्ष लावलेच नसल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक नारायण पवार यांंनी केला. तसेच प्रशासनानेदेखील जिओ टॅगवर केवळ २१ हजार वृक्षांची माहिती दिल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त सदस्यांनी शासनाला चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप करून प्रशासनाला धारेवर धरले.जिओ टॅगच्या मुद्यावरून सर्वपक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यात शासनाला सादर केलेल्या अहवालाचा आधार घेऊन शहरात एवढी वृक्षलागवड झाली नसल्याचा आरोप पवार यांनी केला. त्याची माहिती तत्काळ सभागृहाला मिळावी, असा आग्रह धरला. त्यानुसार, प्रशासनाच्या वतीने उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी शहरात सुमारे ४५ हजार वृक्षांची लागवड केली असून २१ हजार वृक्ष जिओ टॅगवर घेतल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाच्या या उत्तरामुळे सदस्य आणखी आक्रमक झाले. जिओ टॅगवर जर २१ हजार वृक्षांचा उल्लेख आहे, तर मग शासनाला दिलेल्या अहवालात ४५ हजार असा उल्लेख का केला, असा सवाल केला. दुसरीकडे शीळच्या डोंगरावर ३२ हजार वृक्षलागवडीचा दावा प्रशासनाने करताच राष्ट्रवादीचे नगरसेवक हिरा पाटील यांनी एवढे वृक्ष असतील, तर मी नगरसेवकपदाचा राजीनामा देईन, असा इशारा दिला.