शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

ठाणे मनपाने केली सर्वाधिक वसूली

By admin | Published: May 05, 2017 5:42 AM

मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा ठाणे महापालिकेने विविध करांतून तब्बल २०५० कोटींची विक्रमी वसुली केली असून ती राज्यातील

ठाणे : मागील चार वर्षांच्या तुलनेत यंदा ठाणे महापालिकेने विविध करांतून तब्बल २०५० कोटींची विक्रमी वसुली केली असून ती राज्यातील इतर महापालिकांच्या तुलनेत अव्वल आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन ठाणे महानगरपालिकेचा सन्मान करण्यात आला. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तो स्वीकारला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे राज्य शासनाच्या नगर विकास विभाग आणि नगर प्रशासन विभागाच्या वतीने या वर्षीपासून आयोजित करण्यात आलेल्या नगर विकास दिनाच्या भव्य कार्यक्र मामध्ये हा पुरस्कार वितरित करण्यात आला. या वेळी नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार राज पुरोहित, मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होते. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या समारंभात सर्वाधिक वसुलीसाठी ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महापालिकेचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.गेल्या दोन वर्षांत ठाणे महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये उल्लेखनीय अशी भर पडली आहे. विशेषत: जयस्वाल यांनी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी वसुली आणि उत्पन्नवाढीसाठी कठोर मेहनत घेतली. त्यामुळेच २०१३-१४ च्या ११५४.३७ कोटींच्या तुलनेत सन २०१४-१५ मध्ये महापालिकेचे उत्पन्न १३७६.६ कोटींवर गेले, म्हणजेच तब्बल २२२ कोटी रुपयांनी वाढले. २०१५-१६ मध्ये महापालिकेचे उत्पन्न १३७६.६ कोटींवरून १७८८.५१ कोटींवर पोहोचले. या वर्षात महापालिकेच्या उत्पन्नामध्ये ४१२ कोटी रुपयांची विक्र मी वाढ झाली, तर २०१६-१७ मध्ये महापालिकेचे उत्पन्न २०५०.०९ कोटींवर पोहोचले. या वर्षात महापालिकेच्या उत्पन्नात २६१ कोटी इतकी वाढ झाली. (प्रतिनिधी)