- सदानंद नाईक उल्हासनगर : मणिपूर येथील अमानवीय कृत्याचा तालुका वकील संघटना व ऍडऑकेट फॉर जेस्टिस संघटनेच्या वतीने हाताला काळ्या फित्या लावून निषेध केला. तसेच प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.
उल्हासनगर तालुका वकील संघटना व ऍडओकेट्स फॉर जस्टीस संघटनेच्या वतीने, मणिपूर मधील अमानवी घटनेचा व अकार्यक्षम सरकारचा सोमवारी निषेध करून निषेध दिवस पाळण्यात आला. संघटनेच्या सर्व वकिलांनी काळ्या व लाल फिती लावून निषेध व्यक्त केला असून प्रांत अधिकार जयराज कारभारी यांना निवेदन देण्यात आले. निषेध मोर्चात संघटने अध्यक्ष छोटू पॅंथलिया, उपाध्यक्ष राहुल गरुड, गिरीश लालचंदनी, आणि सहसचिव पंकज महाले तसेच अडओकेट्स फॉर जस्टीस संघटनेचे अध्यक्ष धम्मपाल तिडके, कार्याध्यक्ष उमेश केदार, खजिनदार संदीप पगारे, संजय सोनावणे, वैशाली बनसोडे, रोहिणी, अर्चना घोटपगार, कमलेश साळवे, प्रभा भांबरे, व इतर वकील सदस्य उपस्थित होते.