ठाणे: ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना मानद ‘कमांडर’ हि पदवी प्रदान करण्यात आली. लेफ्टनंट जनरल समन्वार व पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते मान - अभिमानाचा लष्करी वेष देऊन त्यांना गौरविण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान व राष्ट्रीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड येथे झालेल्या १९७१ भारत - पाक युद्धाच्या विजय दिन स्मृती समारंभात त्यांचा गौरव करण्यात आला. इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनाही याच सन्मानाने यावेळी गौरविण्यात आले. ‘सैनिक शाळेत शिक्षण घेतले पण लष्करात दाखल होऊन देशसेवा करता आली नाही. राष्ट्रीय सैनिक संस्थेने मला कमांडर या पदवीने सन्मानित केल्याने माझी इच्छा पूर्ण झाली. या गणवेशाचा आणि सन्मानाचा मान राखून सुरु असलेले देशकार्य अखंडित सुरु ठेवीन अशा शब्दांत आ. केळकर यांनी बोलताना कृतज्ञता व्यक्त केली. ते सन्मान सोहळ््यात बोलत होते. १९७१ भारत - पाक युद्धात विशेष पराक्र म करणारे जवान, अधिकारी व त्यांच्या वीरपत्नी अशा एकूण २० जणांचा या समारंभात सन्मान करण्यात आला. पोलीस दलात उल्लेखनीय कामिगरी करणाºया अधिकाºयांचाही सन्मान यावेळी करण्यात आला. भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन आणि अमर जवानांच्या प्रतिकृतीस पुष्पचक्र समर्पण, राष्ट्रभक्तीपर गीते आदी कार्यक्रमांमुळे या समारंभाला विशेष गांभीर्य प्राप्त झाले. दरवर्षी १६ डिसेंबर हा ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी प्रथमच वरील तिघांचा मानद ‘कमांडर’ पदवीने बहुमान करण्यात आला व त्यांना सन्मान कमांडरचा युनिफॉर्म प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्र माचे सूत्रसंचालन सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे यांनी केले.
ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना राष्ट्रीय सैनिक संस्थेमार्फत मानद ’कमांडर’ पदवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 3:32 PM
ठाण्याचे आमदार संजय केळकर यांना मानद ’कमांडर’ पदवी देऊन गौरविण्यात आले.
ठळक मुद्देसंजय केळकर यांना मानद ’कमांडर’ पदवीइतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचाही गौरव सुरु असलेले देशकार्य अखंडित सुरु ठेवीन - आ. केळकर