लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: एमएमआरडीएकडून कोपरी रेल्वे ब्रिजचे काम शनिवारी रात्री ११ ते २३ मे रोजी (रविवारी) सकाळी ६ या सात तासांच्या काळात सुरु राहणार आहे. त्यामुळे या काळात ठाणे मुंबई हा पूर्व द्रूतगती महामार्ग सात तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात अन्य पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे करण्यात आले आहे.एमएमआरडीएमार्फत कोपरी रेल्वे ब्रिजचे काम करण्यात येत आहे. या कामासाठी ज्ञानसाधना कॉलेज आणि कोपरी पूर्व या मार्गाला जोडणारा पथवे ब्रिज काढण्यात येणार आहे. त्या कामासाठी मोठी क्रेन रोडवर ठेवून हे काम होणार आहे. त्यामुळे कोपरी ब्रिजवरुन मुंबई ते ठाणे आणि ठाणे ते मुंबई अशी दोन्ही मार्गांवरील वाहतूक ही पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. त्यासाठी ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. परंतू, या मार्गावर राज्याबाहेर आणि राज्यांतर्गत वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. या वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करुन पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.*मोठया वाहनांसाठी पर्यायी मार्ग- नाशिक मुंबई महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रूतगतीने मुंंबईकडे जाणाऱ्या अवजड (मोठया ट्रक, ट्रेलर आदी) वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने खारेगाव टोलनाका येथून गॅमन चौकमार्गे पारसिक रेती बंदर मुंब्रा बायपास येथून रबाले, ऐरोली ब्रिजमार्गे मुंबईत जातील.* त्याचवेळी घोडबंदर महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रूतगती मार्गाने मुंबईकडे जाणाºया मोठया वाहनांना माजीवडा ब्रिजवर उजवे वळण घेण्यास तसेच गोल्डन क्रॉस ब्रिजखाली प्रवेश बंद केला आहे. त्याऐवजी ही वाहने तत्वज्ञान सिग्नल पुढे माजीवडा ब्रिजवरुन खारेगाव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन पारसिक रेती बंदरमार्गे रबाले, ऐरोली ब्रिज मार्गे मुंबईत जाणार आहेत.* लहान वाहने- मोटारकारसारख्या लहान वाहनांनाही नौपाडा सर्व्हिस रोड महालक्ष्मी मंदिर समोरुन कोपरी ब्रिजकडे जाण्यासाठी प्रवेश बंद राहणार आहे. त्याऐवजी या वाहनांना साकेत येथून डावीकडे वळण घेऊन साकेत रोड, क्रिकनाका डावीकडे वळण घेऊन शिवाजी चौक, कळवा विटावा मार्गे ऐरोली येथून मुंबईत जाण्यासाठी प्रवेश राहणार आहे.* तसेच ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी हलकी वाहने जिल्हा मध्यवर्ती कारागृह रोड येथून विटावा, ऐरोली मार्गे मुंबईत जातील. तर घोडबंदर रोड आणि ठाणे शहरातून मुंबईकडे जाणारी लहान वाहने ही तीन हात नाका येथून मॉडेला चेक नाका मार्गे मुंबईत जाणार असल्याचे वाहतूक शाखेने म्हटले आहे.
ठाण्यातील कोपरी रेल्वे ब्रिजच्या कामासाठी ठाणे मुंबई मार्ग सात तास बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 10:22 PM
एमएमआरडीएकडून कोपरी रेल्वे ब्रिजचे काम शनिवारी रात्री ११ ते २३ मे रोजी (रविवारी) सकाळी ६ या सात तासांच्या काळात सुरु राहणार आहे. त्यामुळे या काळात ठाणे मुंबई हा पूर्व द्रूतगती महामार्ग सात तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या मार्गावर राज्याबाहेर आणि राज्यांतर्गत वाहनांची मोठया प्रमाणात वर्दळ असते. या वाहनांची कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी करुन पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.
ठळक मुद्देशनिवारी रात्री ते रविवारी सकाळी सुरु राहणार काम पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन