ठाणे - गेल्या वर्षी मालमत्ता करामध्ये १० टक्के करवाढ सुचवण्यात आली असली तरी आज सादर झालेल्या ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कोणत्याही प्रकारची करवाढ सुचवली नाही. ठाणेकरांवर कराचा बोजा न लादता केवळ अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे. गेल्या वर्षी ३ हजार 600 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा 3861 कोटींचा संकल्पपूर्ती अर्थसंकल्प सादर झाला आहे.
मागील वर्षी जयस्वाल यांनी सुमारे 3,600 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यावर्षी त्यामध्ये सुमारे 200 कोटींची भर घातली गेली आहे. मागील चार वर्षात शहरात विविध विकास कामांची घोषणा केली होती. त्यापैकी काही कामांची अंमलबजावणी झाली तर काही कामे अजूनही प्रलंबित आहेत. खार्या पाण्यापासून गोड पाणी करणे, घोडबंदर मार्गाकरिता पर्यायी कोस्टल रोड, जल वाहतूक, कचर्यापासून वीजनिर्मिती, पूर्व ठाण्यातील दुसरा सॅटीस पूल, अंतर्गत मेट्रो प्रकल्प, विस्तारित ठाणे रेल्वे स्थानक, नवीन ठाणे, क्लस्टर योजना, कॅन्सर हॉस्पिटल, उथळसर येथील संजीवनी तलाव पुनर्जिवित करणे, तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन येथील वाहतूककोंडीतून ठाणेकरांची सुटका करण्यासाठी तेथे तिसरा उड्डाणपूल आदी प्रकल्प राबवण्याचे वचन त्यांनी ठाणेकरांना दिले होते. हे सर्व प्रकल्प आगामी वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प या अर्थसंकल्पात केला असल्याचे सूत्राने सांगितले.
जयस्वाल यांनी मागील तीन वर्षात शहरातील रस्त्याचे रुंदीकरण करून ठाण्याचा चेहरा मोहरा बदलला. ठाणे शहराबरोबरच त्यांनी दिव्यासारख्या ग्रामीण भागाच्या विकासाकडे लक्ष दिले होते. गेल्या चार वर्षात अनेक प्रकल्पांची घोषणा केली असल्याने यंदाच्या अर्थसंककपात या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला असून या प्रकल्पाची पूर्तता करण्याचा संकल्पपूर्ती अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. कोस्टल रोड, अंतर्गत मेट्रो आणि पीआरटीएस साठी 500 कोटीचे कर्ज घेतले जाणार आहे. 91 टके रास्ते विकास करणार, क्लस्टर योजना राबविली जाणार, टॉउन सेंटर उभारले आहे यात 70 कोटी पालिकेचे वाचले, ठाण्यामध्ये रोजगार संधी दिल्या जाणार, पार्किंग सुविधा विकसित केल्या जाणार यामध्ये 119 कोटींची बचत झाली, आरोग्य विषयकमध्ये आत्मिक विकास केला जाणार, सेंट्रल पार्क विकसित, कम्युनिटी पार्क, बगीचा विकास, तलाव विकास केला जाणार. पोखरण रोड 2 स्पोर्ट्स सेंटर लवकरच पूर्ण होणार. दिवा गावचा विकास, पोलीस ठाणे विकास केली जाणार, बीएसयूपी मधून 1847 घरे मिळणार, खिड़काली येथे 113 हेक्टर एज्युकेशनल हब तयार होणार, विकास प्रस्तावामध्ये 1 खिडकी प्रणाली, पेपरलेस कारभार केला जाणार, आरक्षण फेरबदल करुन विकास, माजीवडा येथे पार्किंग आरक्षण विकसित, पेंट दी वाल प्रकल्प सुरू राहणार यावर्षी पार्ट 2 राबविली जाणार.
57 टक्के रस्ते खड्डे मुक्त असणार, डीपी रास्ते विकसित केले जाणार, 97 टक्के डीपी रास्ते विकसित केले जाणार, 403 कोटींची तरतूद रस्ते विकास करण्यासाठी, उड्डाण पूल काम सुरू आहेत, कोपरी पूल, कळवा खाडी पूल डिसेंबरमध्ये पूर्ण होणार 60 टक्के पुलाचे काम पूर्ण, पादचारी पुल 7 तयार होणार, रेल आरओबी काम सुरू आहे, मफतलाल येथील आरओबी काम ऑक्टोबरमध्ये काम पूर्ण होणार, दिवा आरओबी सुधा सुरू होणार, तीन हाथ नाका येथे ग्रेड सेपरेटर विकसित केले जाणार, अंतर्गत मेट्रो 29 किमी, 22 स्टेशन असणार त्यासाठी 40 कोटी तरतूद, जलवाहतूक व पीआरटीएस विकसित केले जाणार. जलवाहतुकीसाठी 5 कोटी तरतूद, पीआरटीएस 103 किमी असणार, ठाणे आणि मुंब्रा यांचा समावेश असणार, खाडी विकास केला जाणार, पर्यटन विकास, स्मार्ट सिटी अंतर्गत चौपाटी विकास, पारसिक, वाघबिल, गायमुख चौपाटी विकास, 6 ठिकाणी अग्निशमन केंद्र इमारत विकास केले जाणार, बिट फायर स्टेशन विकसित केले जाणार. शाळा उभारणीसाठी 8 कोटी, दवाखाने उभारणे, बस डेपो विकास केला जाणार आहे.
मुंब्रा येथे हज हाउस उभारले जाणार असून 10 कोटींची तरतूद, आगरी आणि जेष्ठ नागरिक भवन उभारले जाणार, डाईघर एकात्मिक विकास प्रकल्प, जेएनउतार एम अंतर्गत हाउस होल्ड कनेक्शनसाठी ड्रेनेज हाउस योजनासाठी 40 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. इलेक्ट्रीक बस 100 येणार, 50 डायलेसिस मशीन 1 हजार नागरिकांनी फायदा घेतला, एमसीआयमार्फ़त डाईघरमध्ये 1200 टन मेट्रिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार, मोबाइल कचरा व्हॅन विकसित केली जाणार, दिवा दुमिप गरुण्ड बँड करुण गार्डन तयार करणार 15 कोटी तरतूद, ट्री ट्रान्सप्लांट मशीन पालिकेत दाखल होणार, 2 लाख वृक्ष लागवड, खारफुटीसाठी 1 कोटी तरतूद, गुलाब पुष्प उद्यान, सायलेन्स झोन, 5 गार्डन मधे मिनी ट्रेन, ग्रीन वाल विकसित केले जाणार, पर्यावरण विभागसाठी कृती आराखडा हवा प्रदुषण मोजणी यंत्रणा, नाले पाणी शुद्ध केले जाणार, शिक्षण विभागासाठी विशेष तरतूद.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी 2 कोटी, मुलांना ठाणे दर्शनसाठी 1 कोटी, क्रीड़ा सुविधांसाठी एमसीएच्या धरतीवर क्लब हाउस विकसित केले जाणार, महिला बाल कल्याण योजना राबविली जाणार, राजकन्या योजना, घटस्फोटीत महिलांना अनुदान, दिव्यांगांना निधी, स्मार्ट सिटी अंतगर्त योजनेसाठी 50 कोटी, विशेष प्रकल्प - हॅपीनेक्स इंडिस्क्समध्ये व्हर्टिकल गार्डन, उद्यान दत्तक योजना, विद्यार्थी वृक्ष दत्तक योजना, मुलासाठी कला उपक्रम, फिरते ग्रँथले, डिजिटल साखरष्टा योजना, डीजी लॉकर, रक्त कर्क रोग निदानसाठी योजना हापयनेस्ट इंडेक्ससाठी 100 कोटी, तसेच परिवहनसाठी 132 कोटी अनुदान प्रस्तावित, मल्टी मॉडल कॉरिडोर सुरू होणार.