शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

ठाणे महापालिकेने स्वच्छता अ‍ॅपच्या ताज्या सर्व्हेत राज्यात मारली क्रमांक एकची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 3:45 PM

स्वच्छता अ‍ॅपच्या ताज्या सर्व्हेत ठाणे महापालिकेने २७ व्या क्रमांकावरुन राज्यात थेट पहिल्या क्रमांकावर उडी घेतली आहे. तर देशात ठाणे महापालिका दुसऱ्या क्रमाकांवर आली आहे.

ठळक मुद्दे४७ हजार ५८७ नागरीकांनी केले अ‍ॅप डाऊनलोडतक्रारी सोडविण्याचे प्रमाण ९८.१ टक्के

ठाणे - स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करीत असलेल्या ठाणे महापालिकेला अद्याप स्वच्छता अ‍ॅपचे टारगेट पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. परंतु आता ताज्या सर्व्हेक्षणानुसार ठाणे महापालिकेने या अ‍ॅपच्या सर्व्हेक्षणात बाजी मारली असून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर देशात दुसऱ्या क्रमांकावर ठाणे महापालिका आली आहे. आजच्या घडीला ठाणे महापालिकेच्या या स्वच्छता अ‍ॅपवर ४७ हजार ५८७ नागरीकांनी प्रतिसाद दिला आहे. तर यातील १४ हजार ३२८ नागरीक हे त्यात अ‍ॅक्टीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. अ‍ॅक्टीव्ह असलेल्यांची संख्या कमी असली तरी देखील पालिकेने मात्र या अ‍ॅपच्या सर्व्हेत केवळ एका महिन्यातच २७ वरुन थेट राज्यात क्रमांक १ पर्यंतची तर देशात दुसऱ्या क्रमांकापर्यंतची आता येत्या काही दिवसात देशात पहिल्या क्रमांकावर झेप घेऊ असा विश्वास ठाणे महापालिकेने व्यक्त केला आहे.                       स्वच्छता अ‍ॅपच्या बाबतीत उदासीन धोरण राबविणाऱ्या ठाणे महापालिकेला या अ‍ॅप बाबत ठाणेकरांनी अल्प प्रतिसाद दिल्याची माहिती डिसेंबरच्या अखेरीस समोर आली होती. डिसेंबर अखेर पर्यंत ४० हजार नागरीकांची नोंदणी अपेक्षित असतांना हे अ‍ॅप केवळ २४ हजार नागरीकांनीच डाऊनलोड केले होते. परंतु डिसेंबर अखेरची तारीख ३१ जानेवारी करण्यात आल्यानंतर या कालावधीत आतापर्यंत तब्बल ४७ हजार ५८७ नागरीकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. जर ४० हजार नागरिकांनी हा अ‍ॅप डाउनलोड केला तर १५० गुण ठाणे महापालिकेला मिळाणार आहेत. आता त्या पलीकडे महापालिकेने उडी घेतली आहे. जनाग्रह अ‍ॅपच्या जनजागृतीसाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यानुसार ०६ फेब्रुवारी पर्यंत हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यांचा आकडा हा ४७ हजार ५८७ एवढा झाला असून या अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या १४ हजार ३२८ एवढी आहे. तर ३३ हजार २५९ नागरीकांनी हा अ‍ॅप केवळ डाऊनलोड केला आहे. तर या अ‍ॅपवर आलेल्या २ लाख एक हजार ४०५ तक्रारींपैकी तब्बल १ लाख ९९ हजार ८३७ तक्रारींचे निवारण पालिकेने केले आहे. तर १ हजार ५१६ तक्रारी या रद्द करण्यात आल्या आहेत. तर या अ‍ॅपमुळे ५६ हजार ७५८ नागरीकांपैकी ५५ हजार ६७६ नागरीकांनी पालिकेने केलेल्या कामाप्रती समाधान व्यक्त केले आहे. तर केवळ ७७२ नागरीकांनी असाधान व्यक्त केले आहे. समाधान व्यक्त करण्यांची टक्केवारी ही ९८.१ टक्के एवढी आहे.पालिकेने केलेल्या या कामामुळेच २० डिसेंबर रोजी पालिका या अ‍ॅपच्या सर्व्हेत २७ व्या क्रमांकावर होती. आज तोच क्रमांक थेट राज्याच्या क्रमवारीत एकवर आला आहे. तर देशाच्या क्रमवारीत ठाणे महापालिका या अ‍ॅपमुळे क्रमांक दोनवर आली आहे. परंतु येत्या काही दिवसात आम्ही पहिल्या क्रमांकावर जाऊ असा विश्वासही पालिकेने व्यक्त केला आहे.

  • तर या अ‍ॅपच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ग्रेटर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पूणे तिसऱ्या  , पिंपरी चिंचवड चवथ्या वसई ६ व्या आणि कल्याण ७ व्या क्रमांकावर आणि नाशिक ८ व्या क्रमांकावर आहे.

 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त