ठाणे : कोरोनाच्या लसीला अखेर मान्यता मिळाली आहे. प्रत्यक्षात लस कधी दिली जाणार आहे या संदर्भात अजून शासनाने निश्चिती दिली नाही. परंतू ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही लस कशी घ्यावी यासाठी शासनाने ड्राय रन घेण्याचे आदेश दिले आहे. अद्याप त्याची तारीख मात्र निश्चित झाली नसली तरी पालिकेने कोरोना लसीकरण ड्राय रनचा सेट अप उभारला आहे. ही रंगीत तालीम कधी असेल याची तारीख पालिकेने जाहीर केलेली नाही.
ठाणे पूर्व येथील पालिकेच्या सेठ लखमीचंद फतीमचंद प्रसतिगृह येथे पालिकेने सेट अप उभारला आहे. या ड्राय रन मध्ये लसीकरण मोहीम कशी राबवावी, त्याचे प्रयोजन कसे असावे याचे मार्गदर्शन २८ आरोग्य केंद्राना केले जाणार आहे. या ड्राय रनला आज सकाळी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी भेट देऊन माहिती घेतली.