शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

ठाणे महापालिका : कचरा करणाºयांकडून १ डिसेंबरपासून दंड वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 6:47 AM

उघड्यावर शौचास बसलात, कचरा टाकताय, रस्त्यात थुंकत आहात, तर मग थांबा. कारण तुमच्यावर आता तब्बल २४५ सफाई मार्शल वॉच ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

ठाणे : उघड्यावर शौचास बसलात, कचरा टाकताय, रस्त्यात थुंकत आहात, तर मग थांबा. कारण तुमच्यावर आता तब्बल २४५ सफाई मार्शल वॉच ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे असे काही कृत्य करीत असाल तर तुम्ही दंड भरण्यासाठीही तयार राहा असा इशाराच पालिकेने दिला आहे. येत्या १ डिसेंबरपासून सफाई मार्शल दंड वसूल करण्यासाठी शहरभर फिरणार आहेत.शहर अस्वच्छ करणाºया नागरिकांना दंड आकारून चाप बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. या संदर्भात २०१२ मध्ये उपविधीसुद्धा तयार केली होती. तिला अखेर शासनाने मंजुरीदिली आहे. आता शहर अस्वछ करणाºया व्यक्तींकडून वसूल करण्यात येणाºया दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. शहरात दररोज ७०० मेट्रीक टन कचरा निर्माण होत असून तो गोळा करण्यासाठी पालिकेजवळ १५० घंटागाड्या आहेत. पाच वर्षापूर्वी शहरात ५०० पेक्षा अधिक कचरा टाकण्याची ठिकाणे होती. हे प्रमाण १५० वर आले असले तरी उघड्यावर कचरा टाकणाºयांची संख्या मात्र कमी झालेली नाही. केवळ उघड्यावर कचरा टाकणे इथपर्यंत हे प्रमाण मर्यादित नसून रस्त्यांवर थुंकणे, स्नान करणे, मुत्र विसर्जन करणे, इमारतीची मलावाहिनी अथवा जलवाहिनी फुटणे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचºयाचे विभक्तीकरण करणे अशा अनेक गोष्टींचे पालन न करण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पालिकेने नव्याने उपविधी तयार केली असून या उपविधीला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार आता १० रुपयांपासून थेट २० हजारापर्यंत दंड आकारला जाणार आहे. यासाठी आता २४५ सफाई मार्शलच्या नेमणुकीची निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून त्याचा प्रस्तावदेखील नुकत्याच झालेल्या महासभेने मंजूर केला आहे. त्यानुसार आता प्रत्येक प्रभाग समितीत साधारणपणे प्रत्येकी २५ या प्रमाणे, हे मार्शल १ डिसेंबरपासून वॉच ठेवणार आहेत.आॅन ड्युटी २४ तास या प्रमाणे ते काम करणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाने स्पष्ट केले आहे.अशी आहे दंडाची रक्कमसार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे २०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १००, सार्वजनिक ठिकाणी आंघोळ करणे १००, मुत्र विसर्जन १५०, प्राणी व पक्ष्यांना खाद्य भरवणे ५००, रस्त्याच्या कडेने शौचास बसने १५०, व्यावसायिक वाहनांना रस्त्याच्या कडेला धुणे १०००, रस्त्याच्या कडेला कपडे व भांडी धुणे १००, अस्वस्छ परिसर आणि आवार १०,०००, इमारतीच्या पिण्याच्या पाइपलाईन मधील सांडपाण्याच्या पाईपलाईन मधील गळती आणि त्यामुळे इतरांना होणारा त्रास आणि सुचना दिल्यानंतरही १० दिवसात दुरु स्ती न केल्यास १०,००० रु पयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका