ठाणे - ठाणे महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत यंदा दिव्यांग व्यक्तींसाठी कल्याणकारी योजना १०० टक्के राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी मदत, ६० वर्षावरील दिव्यांगाना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य, व्हिलचेअर उपलब्ध करुन देणे, कुष्ठ रुग्णांना उदरनिर्वाहासाठी अनुदान आदींसह इतर योजनांचा समावेश करण्यात येऊन यासाठी २५ कोटी ५० लाखांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या १९ सप्टेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. दिव्यांगासाठी दरवर्षी विविध योजनांची घोषणा केली जाते. परंतु मागील चार ते पाच वर्षात या योजनांसाठी तरतूद करण्यात आली होती. परंतु त्याचे नियोजनच होत नसल्याने त्याचा लाभ दिव्यागांना मिळत नव्हता. परंतु मागील वर्षी पासून पालिकेने नियोजनावर भर देण्यास सुरवात केली असून दिव्यांगाच्या निधीतही वाढ केली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाकरीता शिष्यवृत्ती, अर्थसहाय्य लाभार्थ्यांची संख्या ५००, उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य लाभार्थी संख्या १५०, खेळाडूकरीता शिष्यवृत्ती अर्थसहाय्य लाभार्थी संख्या १०, दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाहसाठी निधी थेट बँक खात्यात लाभार्थी संख्या २१००, व्यवसायासाठी निधी किंवा साहित्य खरेदी लाभार्थी संख्या १५०, वैद्यकीय खर्चासाठी अर्थसहाय्य लाभार्थी ५०, बचत गटांना सहाय्य लाभार्थी ३०, ६० वर्षावरील दिव्यांगाना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य लाभार्थी ३००, बेराजगार भत्ता लाभार्थी ५००, लग्नासाठी अर्थसहाय्य लाभार्थी १००, कुष्ठ रुग्णांना उदरनिर्वाहासाठी अनुदान लाभार्थी ५५० आदींसह इतर योजनांचाही समावेश करण्यात आला असून त्यासाठीसुध्दा आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यासाठी २५ कोटी ५० लाखांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली असून या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
दिव्यांगाच्या उदरनिर्वाहासाठी ठाणे महापालिकेने उचलले पाऊल, २५.५० कोटींची केली तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 3:37 PM
दिव्यांगाना विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार यासाठी २५.५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.
ठळक मुद्देकुष्ठ रुग्णांनाही मिळणार मदतउदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य