लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून निर्बंध लागू केल्यानंतर शनिवार रविवारबरोबरच सायंकाळी ४ नंतरही दुकाने खुली ठेवणाºया नौपाडयातील दुकानदारांवर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. तर बेकायदा फेरीवाल्यांसाठी अतिक्र मण विभाग आणि महापालिकेकडून पायघडया टाकल्या जात आहेत, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला आहे. नौपाडयासह अनेक ठिकाणी बिनधिक्कतपणे फेरीवाल्यांकडून पदपथांवर पथारी मांडली जाते. तर ‘ना-फेरीवाला’ क्षेत्रातही घुसखोरी केली जात आहे, याकडे वाघुले यांनी लक्ष वेधले आहे.महापालिकेकडून दुकानदारांवर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार शनिवारी आणि रविवारी दुकाने खुली ठेवणाºया दुकान चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यासाठी पालिकेचे पथक सातत्याने नौपाडा परिसरात गस्तही घालते. मात्र, त्याचवेळी पदपथावर दुकाने थाटणाºया फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नाही. इतकेच रेल्वे स्थानकापासून १५०मीटर क्षेत्रात ना-फेरीवाला क्षेत्र आहे. मात्र, त्यातही फेरीवाल्यांकडून घुसखोरी केली जाते. या प्रकाराविरोधात स्थानिक नगरसेवक वाघुले यांनी अतिक्र मण विभागाचे उपायुक्त, नौपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांकडे वारंवारतक्र ारी केल्या. मात्र, त्याची दखल घेतली नाही. काही वेळा थातुरमातूर कारवाई केली जाते. मात्र, जुजबी दंड आकारून फेरीवाल्यांना पुन्हा सामान दिले जाते. ते सामान घेऊनच पुन्हा फेरीवाले त्याच ठिकाणी पथारी पसरतात. त्यामुळे अतिक्र मण विभागाच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आर्थिक हितसंबंधांमुळे कठोर कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असावे, असा आरोपही वाघुले यांनी केला आहे.
ठाणे महापालिकेची व्यापाऱ्यांवर कारवाई; फेरीवाल्यांना मात्र पायघडया !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2021 11:57 PM
या प्रकाराविरोधात स्थानिक नगरसेवक वाघुले यांनी अतिक्र मण विभागाचे उपायुक्त, नौपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांकडे वारंवार तक्र ारी केल्या. मात्र, त्याची दखल घेतली नाही. काही वेळा थातुरमातूर कारवाई केली जाते. मात्र, जुजबी दंड आकारून फेरीवाल्यांना पुन्हा सामान दिले जाते. ते सामान घेऊनच पुन्हा फेरीवाले त्याच ठिकाणी पथारी पसरतात.
ठळक मुद्दे भाजपने वेधले लक्ष ना फेरीवाला क्षेत्रातही घुसखोरी