शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
2
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
3
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
4
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
5
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
6
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
7
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
8
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
9
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
10
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
11
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
12
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
13
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
14
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
15
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
16
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
17
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
18
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
19
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
20
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...

ठाणे महापालिकेचे उत्पन्न 900 कोटींनी होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 2:27 AM

Thane Municipal Corporation : मुंबई महापालिकेपाठोपाठ आता शुक्रवारी ठाणे महापालिकेचे २०२१ - २२चे मूळ अंदाजपत्रक सादर होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे पालिकेची आर्थिक घडी विस्कटलेली आहे.

ठाणे : मुंबई महापालिकेपाठोपाठ आता शुक्रवारी ठाणे महापालिकेचे २०२१ - २२चे मूळ अंदाजपत्रक सादर होणार आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे पालिकेची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यामुळे महापालिकेने मोठ्या प्रकल्पांना आधीच कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे गेली दोन वर्षे केवळ फुगवलेल्या अर्थसंकल्पामुळे आकडेही फुगल्याचे दिसले होते. यंदा मात्र कोरोनामुळे आर्थिक घडीच विस्कटलेली असल्याने आणि वर्षभरावर महापालिकेची निवडणूक आल्याने करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प हा ९०० कोटींनी कमी असणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे ठाणेकरांना यंदा नवीन काही मिळणार नसले तरी उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अंतर्गत मेट्रोऐवजी एलआरटीची भेट मात्र मिळणार आहे.गेल्या वर्षी तीन हजार ७८० कोटींचे बजेट सादर केले होते. या आकड्यात मोठी घट यंदाच्या अर्थसंकल्पात निश्चित मानली जात आहे. मागील काही वर्षांत मोठमोठे प्रकल्प हाती घेतल्याने उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविता आलेला नाही. त्यात मागील दोन वर्षांत मोठमोठे प्रकल्प कागदावर दाखवून अर्थसंकल्पाचे आकडेही फुगवे केले होते. त्यामुळे मागील वर्षीचा अर्थसंकल्प हा फुगवा असल्याचेही दिसून आले होते. एकूणच मागील काही वर्षांत नको त्या प्रकल्पांवर खर्च झाल्याने महापालिकेवर आता ३५०० कोटींचे दायित्व आले आहे. त्याची सांगडही यंदाच्या अर्थसंकल्पात घालावी लागणार आहे. याशिवाय कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली असून, त्यातून सावरतांना महापालिकेला आताही सुधारित अंदाजपत्रकासाठी ३५० कोटी कमी पडत असल्याची माहितीही समोर आली आहे. मागील काही वर्षीच्या अर्थसंकल्पावर नजर टाकल्यास दरवर्षी किमान १० टक्के वाढ प्रस्तावित करण्यात येत असल्याचे दिसते. मात्र, यंदा हे आकडे ९०० कोटींच्या आसपास घसरण्याची शक्यता आहे. मागील वर्षी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा तीन हजार ७८० कोटींचा होता. यंदा मात्र तो २ हजार ८०० कोटींर्पयत खाली येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.  मोठे प्रकल्प राहणार कागदावरच कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यामुळे यंदा मालमत्ता कर, पाणी कर, शहर विकास विभाग, अग्निशमन, घनकचरा तसेच इतर विभागांचे उत्पन्नाचे टार्गेटही कमी होणार आहे. तसेच महत्त्वाच्या प्रकल्पांना महत्त्व देताना काही दिवास्वप्न दाखविणारे प्रकल्प कागदावरच राहतील, असेही चित्र आहे. गेल्या काही वर्षांत विविध विकासकामांची घोषणा केली आहे. त्यापैकी काही कामांची अंमलबजावणी झाली तर काही अजूनही प्रलंबित आहेत. घोडबंदर मार्गाकरिता पर्यायी कोस्टल रोड, जलवाहतूक, कचऱ्यापासून वीजनिर्मिती, पूर्व ठाण्यातील दुसरा सॅटिस, अंतर्गत मेट्रो प्रकल्प, विस्तारित ठाणे रेल्वेस्थानक, नवीन ठाणे, क्लस्टर योजना, कॅन्सर हॉस्पिटल, उथळसर येथील संजीवनी तलाव पुनजीर्वित करणे, तीनहातनाका, कॅडबरी जंक्शन येथील वाहतूककोंडीतून सुटका करण्यासाठी तेथे तिसरा उड्डाणपूल आदी प्रकल्प राबविण्याचे वचन त्यांनी ठाणेकरांना दिले होते.  त्यातील बरेच प्रकल्प अद्याप कागदावरच असून, यंदाही ते कागदावरच राहतील अशी शक्यता आहे. दुसरीकडे अंतर्गत मेट्रोऐवजी आता पुन्हा एलआरटीचा पर्याय पुढे आल्याने त्याचा यंदाच्या अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात येणार आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे