ठाणे: आपल्याच पत्नीची अनैसर्गिक लैंगिक छळवणूक तसेच हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल झालेले कळव्यातील शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे हे आता पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.गणेश यांनी आपल्या गळ्यावर सुरी ठेवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर केस ओढून भिंतीवर डोकेही आपटले. मिळेल त्या काचेच्या भांड्यानेही डोक्यावर प्रहार केला. अमानुषपणे मारहाण होत असतांना मध्यस्थी करणा-या सासूलाही त्यांनी मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी कॅरलीन कांबळे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली होती. याच संदर्भात त्यांनी कळवा पोलिसांकडेही २८ जानेवारी २०१८ रोजी तक्रार दाखल केली. नशेच्या आहारी गेलेल्या गणेश यांनी त्यांना अनेकदा लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून डोकेही आपटले. शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी राष्टÑवादी महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांनीही त्यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर याप्रकरणी पत्नीचा हुंडयासाठी छळ आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याचाही गुन्हा ९ फेब्रुवारी रोजी दाखल झाला.आधी केवळ मारहाण, शिवीगाळ अशा स्वरुपाचा गुन्हा असल्यामुळे कांबळे यांनी हे प्रकरण फारसे गांभीर्याने घेतले नाही. परंतु, त्यात आणखी दोन गंभीर कलमांची भर पडताच कळवा पोलीसही त्यांना शोधण्यासाठी दोनदा त्यांच्या घरी गेले. मात्र, शनिवारपासून ते बेपत्ता असून घरी किंवा त्यांच्या कार्यालयातही ते आले नाही. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.एकीकडे त्यांच्याविरुद्ध तडीपारीचाही प्रस्ताव प्रलंबित असताना पत्नी कॅरलीन यांनीही एकापेक्षा एक गंभीर आरोप करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यामुळे कांबळे अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जर त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला नाही तर त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाईल. त्याआधीही ते घरी किंवा अन्यत्र आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे कळवा पोलिसांनी सांगितले.
कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाण्यातील नगरसेवक गणेश कांबळे पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 8:33 PM
पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार तसेच तिचा हुंडयासाठी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पसार झालेले नगरसेवक गणेश कांबळे यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
ठळक मुद्दे पत्नीने केली होती तक्रारहुंडयासाठी छळाबरोबर अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराचाही प्रकारकळवा पोलिसांकडून शोध सुरुच