अजित मांडके ठाणे : ठाणे महापालिकेकडून नागरीकांना दज्रेदार आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे. मात्र काही वेळेस वेळेवर रुग्णवाहीका न पोहचणो, रुग्णवाहीकेच्या चालकाकडून मध्येच वेळकाढूपणा करणो आदी तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यामुळे या रुग्णवाहीकेंवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने पावले उचलली आहेत. याचचा एक भाग म्हणून महापालिका आता रुग्णवाहीकांवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित करणार आहे. त्याचा प्रस्ताव येत्या काही दिवसात तयार केला जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शुक्रवारी फिरत्या आरोग्य केंद्राचा शुंभारभ करण्यात आला आहे. हे फिरते आरोग्य केंद्र रुग्णवाहीकेत समाविष्ट करण्यात आले आहे. ते शहरातील २० आदीवासी पाडय़ात फिरणार आहे. पहिल्या टप्यात एकच आरोग्य केंद्र असून त्याची संख्या वाढविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. परंतु या फिरत्या आरोग्य केंद्रावर देखील आता जीपीएस प्रणाली कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. तसेच महापालिकेकडे रुग्णवाहिका देखील आहेत. त्यांची संख्या देखील १५ ते २० च्या घरात आहे. त्यांच्यावर देखील याच माध्यमातून नियंत्रण ठेवले जाऊ शकणार आहे.
महापालिकेने आदीवासी पाडय़ातील नागरिकांसाठी फिरत्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून चांगल्या सुविधा मिळाव्यात, वेळेत सुविधा मिळाव्यात यासाठी या केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु हे फिरते आरोग्य केंद्र दिलेल्या वेळेत दिलेल्या ठिकाणी पोहचले नाही तर त्यामुळे नागरीकांना योग्य त्या सोई, सुविधा किंबहुना उपचार देखील मिळू शकणार नाहीत. त्यामुळेच महापालिकेच्या आरोग्य विभागाने याचा निर्णय घेतला आहे. हीच बाब इतर रुग्णवाहीकांच्या बाबतीत होऊ लागू करण्या मागचे देखील हेच कारण असल्याचे सांगितले जात आहे.जीपीएस प्रणालीचे फायदेया नव्या अत्याधुनिक प्रणालीमध्ये प्रत्येक रुग्णवाहीकेवर आणि फिरत्या आरोग्य केंद्रावर ही यंत्रणा बसविली जाणार आहे. त्याचे ट्रॅकींग किंवा कंट्रोल हे आरोग्य केंद्राकडे असणार आहे. या माध्यमातून रुग्णवाहीका कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी याची अचुक माहिती या जीपीएस ट्रॅकींग सिस्टममुळे महापालिकेच्या आरोग्य केंद्राला उपलब्ध होणार आहे. तसेच रुग्णांच्या ठिकाणी देखील यामुळे वेळेत सुविधा उपलब्ध होणार आहेत.