शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

ठाणे, नवी मुंबईकरांचा १५ रुपयांत ‘प्रीमियम’ प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2023 6:18 PM

गारेगार आणि आरामदायी प्रवासामुळे ही सुविधा प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. 

मुंबईकर प्रवाशांना दर्जेदार सेवा देणाऱ्या बेस्टची प्रीमियम बससेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. प्रीमियम सेवेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता बेस्ट उपक्रमाने नवी मुंबई, दक्षिण मुंबईतून थेट मुंबई विमानतळ अशी सेवा उपलब्ध केली आहे. त्याचबरोबर आणखी ८ मार्गांवर बससेवा दिली जाणार आहे. आणखी बेस्ट उपक्रमाने १५ ते ५० रुपयांत आपली सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईप्रमाणेच ठाणे आणि नवी मुंबईकरांच्या दिमतीलाही बेस्टच्या या प्रीमियम बस देण्यात येणार असून, गारेगार आणि आरामदायी प्रवासामुळे ही सुविधा प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. 

मुंबईकर प्रवाशांच्या सेवेसाठी दिवसरात्र धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाने  १२ डिसेंबरपासून प्रीमियम लक्झरी बससेवा सुरू केली आहे. या सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक, वातानुकूलित प्रीमियम बस ठाणे ते बीकेसी, वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी या मार्गावर दररोज धावत असून, दर अर्ध्या तासाच्या अंतराने धावणाऱ्या या बसमधून दररोज ३०० हून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत.

पहिला प्रवास माफक दरात

मुंबईप्रमाणेच खारघर ते बीकेसी, बेलापूर ते बीकेसी, खारघर ते अंधेरी, बेलापूर ते अंधेरी, लोढा अमारा (ठाणे) ते अंधेरी, कुर्ला ते बीकेसी, गुंडवली ते बीकेसी आणि अंधेरी ते सिप्स या आठ मार्गांवर प्रीमियम बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन प्रवाशांना पहिला प्रवास माफक दरात म्हणजेच १५, २५, ४५ आणि ५० रुपयांमध्ये करता येणार आहे.

ही आहेत प्रीमियम वैशिष्ट्ये

-  ‘बेस्ट’च्या ‘चलो मोबाईल’ ॲपद्वारे  या बसमधील आसन आरक्षित करता येते. -  या बस दर ३० मिनिटांनी धावत असून, बसमध्ये आरामदायी सिट्स आहेत. -  याशिवाय जेवढी आसने तितकेच प्रवासी बसमधून प्रवास करू शकतात. -  वातानुकूलित बसमध्ये प्रवाशांना चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.

टॅग्स :BESTबेस्ट