शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

ठाणे-मुंबईत दीड लाख कोटी खर्चून ३३५ किमी धावणाऱ्या मेट्रोचे जाळे पसरवण्याचा नूतन वर्ष संकल्प

By सुरेश लोखंडे | Published: December 30, 2018 6:31 PM

नूतन वर्ष २०१९ मेट्रोसाठीे एतिहासिक वर्ष ठरणार आहे.

ठळक मुद्दे नूतन वर्ष ठाणे, मुंबईत मेट्रोचे वर्ष ठरणार मेट्रोवर वर्षभरात सुमारे एक लाख ४६ हजार ९८७ कोटी रूपये खर्च करण्याचा संकल्प नूतन वर्ष २०१९ मेट्रोसाठीे एतिहासिक वर्ष ठरणार

- सुरेश लोखंडेठाणे : नूतन वर्ष ठाणे, मुंबईत मेट्रोचे वर्ष ठरणार आहे. या दोन्ही महानगरांमध्ये सुमारे ३३५ किमी. धावणाऱ्या मेट्रोवर वर्षभरात सुमारे एक लाख ४६ हजार ९८७ कोटी रूपये खर्च करण्याचा संकल्प मुंबईमेट्रोपॉलीटन रिजन (एमएमआर) केला आहे. मेट्रोच्या मुख्य सुमारे १२ मार्गांसह सुमारे ६९.७ किमीच्या मुख्य कॉरिडोरच्या कामांचा समावेश आहे. यामध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी या कामांच्या सुमारे एक लाख ४६ हजार ९८७ कोटींचे खर्चाचे आंदाजपत्रक राज्य शासनाच्या संबंधीत प्रशासनाकडे तयार आहे.नूतन वर्ष २०१९ मेट्रोसाठीे एतिहासिक वर्ष ठरणार आहे. मुंबई, ठाणे या महानगरांमध्ये एक लाख ४९ हजार ३४३ कोटी खर्चुन मेट्रो ३४६.४ किमी. सुसाट धावणार असल्याचा संकल्प एमएमआरने या नूतन वर्षात केल्याचे राज्य प्रशासनाच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यातील ११.४ किमी.चा मार्ग क्र.१वर वरसोवा ते घाटकोपर मेट्रो धावत आहे. त्यावर आधीच दोन हजार ३५६ कोटी खर्च झाला आहे. उर्वरित मेट्रोच्या मुख्य ११ मार्ग आणि दोन उपमार्ग मिळून सुमारे २६५.३ किमी मार्ग या नूतन वर्षात मार्गी लागणार आहेत. यावर सुमारे एक लाख २२ हजार ८४५ कोटीं रूपये खर्च अपेक्षित आहेत. यामधील मेट्रोच्या या ११ मुख्य मार्गांसह दोन उपमार्गांपैकी पाच मार्गांचे काम युध्द पातळीवर सुरू आहेत. यात दोन उपमार्गांचाही समावेश आहे. या सर्व मार्गांवर ६१ हजार २८९ कोटीं खर्च होत आहे. यातून दहीसर ते नागर हा १८ किमी.च्या मार्गाचे काम सहा हजार ४१० कोटी खर्चून सुरू आहे. याप्रमाणेच नागर ते मांडला २३ किमी., अंधेरी (इ) ते दहीसर (इ) १६.५ किमी., कुलाबा ते सीपझ ३३.५ किमी.आणि वडाळा ते कासारवडवली हा ३२.३ किमी मार्ग आदी या पाच मार्गांवरील मेट्रोसाठी ६१ हजार २८९ कोटीं खर्चाची कामे सुरू आहेत.        मंजुरी मिळाल्यामुळे या नूतन वर्षात लवकरच ५२.९ किमी. मार्गांचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी २१ हजार ६०७ कोटी रूपये खर्चास शासनाची मंजुरीही मिळाली आहे. यामध्ये ठाणे भिवंडी कल्याण दरम्यानच्या २४ किमी.वर आठ हजार ४१७ कोटी, तर लोखंडवाला ते विक्रोली या १४.५ किमी.च्या मार्गावर सहा हजार ६७२ कोटी खर्च होणार आहे. याप्रमाणेच दहीसर, मीरा रोड, भार्इंदर आणि अंधेरी (इ) ते छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हा १३.५ किमी.च्या मार्गावर सहा हजार ५१८ कोटी खर्चाचे नियोजन आहे. या सर्व ५२.९ किमी.च्या तीन मट्रो मार्गांवर २१ हजार ६०७ कोटी खर्चाचे आंदाजपत्रक तयार झाले आहे.        याप्रमाणेच खर्चाच्या मंजुरीसाठी पाच मेट्रो मार्ग प्रस्तावित आहेत. सुमारे ८७.९ किमी. अंतराच्या या मेट्रोसाठी सुमारे ३९ हजार ९४९ कोटी रूपयांचे आंदाजपत्रक तयार केले आहे. या रकमेतून कासारवडवली ते गायमुख या २.७ किमी.च्या मार्गासाठी ९४९ कोटी खर्च अपेक्षित आहे. तर एअरपोर्ट मेट्रो - नवी मुंबई या दरम्यान ३५ किमी.च्या मेट्रोवर १५ हजार कोटीं रूपये खर्च निश्चित केला आहे. याशिवाय गायमुख ते शिवाजी चौक या ११.२ किमीच्या मार्गासाठी पाच हजार कोटींचा खर्च आहे. वडाळा ते जीपीओ या १४ किमी.च्या मार्गासाठी आठ हजार कोटी आणि कल्याण ते तळोजा या २५ किमी. मेट्रोसाठी ११ हजार कोटी रूपये खर्चाचे काम या नूतन वर्षात हाती घेतले आहे.          या नूतन वर्षाच्या सहा महिन्यातच मेट्रोच्या मुख्य कॉरीडोरची कामे हाती घेण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये ६९.७ किमीच्या मार्गांचा समावेश आहे. त्यासाठी २४ हजार १४२ कोटींच्या खर्चाचे नियोजन आहे. या खर्चातून मंबई मोनोरेलच्या फेस २ च्या कॉरिडोरचा सामावेश आहे. यामध्ये वडाळा ते जाकोब सर्कल या १९.५ किमी.च्या मार्गाच्या कामाचा समावेश आहे. त्यावर दोन हजार ६४० कोटींचा खर्चाचे नियोजन आहे. याशिवाय मे २०१९ या दरम्यान २२ किमी.च्या मुंबई ट्रेन ते हरबर लिंक या कामावर १४ हजार कोटी रूपये खर्च होणार आहे. याप्रमाणेच वरसोवा ते ब्रांद्रा सी लिंक या दरम्यानही नुकतेच तांत्रिक सर्वेक्षण हाती घेतले आहे. सी लिंक आणि एमएसआरडीसीव्दारे सर्वेक्षणाचे काम सुरू असून ते विरारपर्यंत होणार

टॅग्स :Metroमेट्रोMumbaiमुंबईthaneठाणे